केबिन क्रूचा जॉब केला, 'मन उडू उडू झालं' ने मिळाली प्रसिद्धी, आता अभिनेत्री 'या' क्षेत्रात करते काम, कारण सांगत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:37 IST2026-03-23T13:35:14+5:302026-03-23T13:37:57+5:30

खलनायिका साकारून चमकली, 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्री या कारणामुळे अभिनयापासून झालीये दूर, इंडस्ट्रीतील संघर्षावर म्हणाली...

marathi television actress man udu udu jhal fame actress reena madhukar talk about her struggling days what is she doing now | केबिन क्रूचा जॉब केला, 'मन उडू उडू झालं' ने मिळाली प्रसिद्धी, आता अभिनेत्री 'या' क्षेत्रात करते काम, कारण सांगत म्हणाली...

केबिन क्रूचा जॉब केला, 'मन उडू उडू झालं' ने मिळाली प्रसिद्धी, आता अभिनेत्री 'या' क्षेत्रात करते काम, कारण सांगत म्हणाली...

Television Actress: अभिनय क्षेत्र असो किंवा इतर कोणतंही क्षेत्र आयुष्यात संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही. मनोरंजनविश्वात काम करणारे  असे अनेक कलाकार सापडतील ज्यांना हव्या तशा संधी मिळाल्या नाहीत. मात्र, खचून न जाता त्यांना वेगळा पर्याय निवडला. यापैकीच एक नाव म्हणजे रिना मधुकर. आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये अभिनेत्री रीना मधुकरने काम केलं आहे. मात्र, मन उडू उडू झालं या मालिकेने तिला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री तिच्या या अभिनय प्रवासाविषयी तसेच इंडस्ट्रीतील संघर्षावर भाष्य केलं आहे.

अभिनेत्री  रीना मधुकरने आजवर बरंच काम केलं आहे.मात्र,  मन उडू उडू झालं मालिकेतील सानिका नावाच्या पात्राने तिला घरोघरी ओळख मिळाली. दरम्यान, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी रीना केबिन क्रू म्हणून एका नामांकित विमान कंपनीत जॉब करायची. त्यादरम्यान, तिला पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आता रीना निर्मिती क्षेत्रात सक्रिय आहे. 

नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली,"मी दोन वर्ष कॅमेऱ्यापासून दूर आहे. मन उडू उडू झाल्यानंतर अजून काही मालिका कराव्यात किंवा अभिनय क्षेत्रातच काम करावं, असं वाटत होतं. पण, खरंतर मनासारखं काम मिळालं नाही. झी मराठीची इतकी मोठी मालिका केल्यानंतर  मग त्याच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारणा करण्यात आली. तेव्हा असं वाटलं की मला हे नाही करायचं आहे. माझ्या आजवरच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काहीतरी वेगळं केलं आहे. पण, मन उडू उडू झाल्यानंतर मला नकारात्मक भूमिकांच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यातही काहीतरी वेगळेपण असायला हवं, त्यामध्ये मला ते जाणवलं नाही. ही मालिका संपल्यानंतर तोपर्यंत त्या नकारात्मक भूमिकेचा  इतका छाप पडला होता की त्याच पद्धतीच्या भूमिका माझ्याकडे येऊ लागल्या."

रीना आता काय करते?

यानंतर रीनाने सांगितलं, "त्यानंतर मी एका चांगल्या संधीच्या शोधात होते. तोपर्यंत माझ्याकडे प्रोडक्शनची संधी आली. मग म्हटलं, चला हे देखील करून बघूयात. कारण,मला हे कधी ना कधी ते करायचं होतं. मी म्हटलं बघूयात आपल्याला हे आवडतंय का... पण, नंतर मला ते करताना खूप मजा येऊ लागली. मी अभिनय सोडलेला नाही किंवा सोडायची इच्छा देखील नाही. आता प्रोडक्शनमध्ये सगळं सुरळित सुरु आहे."

Web Title : केबिन क्रू से अभिनेत्री: रीना मधुकर के करियर में बदलाव का खुलासा।

Web Summary : 'मन उडू उडू झाला' से प्रसिद्ध अभिनेत्री रीना मधुकर, केबिन क्रू से अभिनय में आईं। शो की सफलता के बाद दोहराए जाने वाले किरदारों से निराश होकर, अब वह प्रोडक्शन में सफल हैं, और अभिनय को एक विकल्प के रूप में रखते हुए बदलाव का आनंद ले रही हैं।

Web Title : Cabin crew to actress: Reena Madhukar's career shift revealed.

Web Summary : Actress Reena Madhukar, famed for 'Man Udu Udu Zhala,' transitioned from cabin crew to acting. Disappointed with repetitive roles after the show's success, she now thrives in production, enjoying the change while keeping acting as an option.