"डर्टी पिक्चरमध्ये विद्या बालनला बघू शकता, पण...", नवरात्रीत केलेल्या बोल्ड फोटोशूटवर अक्षया नाईकची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:27 IST2025-12-24T16:25:30+5:302025-12-24T16:27:25+5:30
नवरात्रीत केलेल्या बोल्ड फोटोशूटवर अक्षया नाईकची प्रतिक्रिया, ट्रोलिंगबद्दल म्हणाली...

"डर्टी पिक्चरमध्ये विद्या बालनला बघू शकता, पण...", नवरात्रीत केलेल्या बोल्ड फोटोशूटवर अक्षया नाईकची प्रतिक्रिया
Akshaya Naik: अभिनेत्री अक्षया नाईक ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री सध्या चर्चेत आली आहे. तिने मराठीबरोबरच हिंदी टेलिव्हिजनचा पडदादेखील गाजवला आहे. अक्षयाने हिंदीतील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्येही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे अभिनेत्रींचं 'झिरो फिगर' आणि 'सुडौल व्यक्तिमत्त्व' असावं ही इमेज ब्रेक करणाऱ्या काही मोजक्या अभिनेंत्रीपैकी अक्षया ही एक आहे. अक्षया नाईक लवकरच एका मोठ्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. अक्षया तिच्या अभिनयासह बेधडक वक्तव्यामुळेही तितकीच चर्चेत असते.
दरम्यान, नुकतीच अक्षया नाईकने 'सकाळ प्रिमिअर'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अभिनय क्षेत्रातील अनुभव तसेच कलाकारांच्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. अलिकडेच नवरात्रीनिमित्त अक्षयाने एक बोल्ड फोटोशूट केलं होतं. त्यामुळे तिला सोशल मीडियावर चांगलाही आणि वाईट प्रतिसाद मिळाला. ते फोटोशूट पाहून नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या, याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा अक्षया म्हणाली,"खरं सांगायचं झालं तर लोक कायम ट्रोल करणार. शिवाय कलाकारांना तर सगळ्यात आधी ट्रोल करतात. कलाकार आणि क्रिकेटर्सना कायम ट्रोल केलं जातं. कारण, आपल्याकडे क्रिकेटला खूप जास्त मानलं जातं. आता ट्रोलिंग आणि सेलिब्रिटी हे एक समीकरण झालंय."
मग पुढे अक्षया म्हणाली,"जेव्हा आम्ही फोटोशूट करत होतो तेव्हा मला माहिती होतं की हे लोक चांगल्या पद्धतीने घेणार नाहीत. पण, मी या सगळ्यासाठी तयार होते. मी सोशल मिडिया दोन गोष्टींसाठी वापरते, एक म्हणजे- असा एक प्लॅटफॉर्मवर जिकडे मला व्यक्त होता येईल. दुसरं म्हणजे- काहीतरी चांगलं करावं, लोकांपर्यंत एक चांगला मेसेज द्यावा, यासाठी वापरते. हे माझं सोशल मिडिया आहे त्याच्यावर मी काय टाकणारे हे मीच ठरवणार. त्याच्यावरती दुसऱ्याचं काय म्हणणं आहे, याकडे मी लक्षच देत नाही."
लोकं बोलणारच आहेत...
त्या फोटोशूटबद्दल अक्षया म्हणाली,"हा माझा नवरात्रीतला तिसरा की चौथा लूक होता. पहिला जो लूक मी राणीचा केला होता तो फुल स्लिव्ह्स, फुल साईज, डबल कपडे घातले आणि लांब केस होते, कुठेही काही दिसत नाही.तेव्हा तर हे लोक आले नाही हे म्हणायला की, 'अरे वाह! खूप छान पूर्ण कपडे घातले आहेस तू...'तेव्हा तर कोणी आलं नाही. माझं म्हणणं हेच आहे, प्रत्येकवेळी जेव्हा एखादी गोष्ट होते तेव्हाच का या ट्रोलर्सना पुढे येऊन बडबड करायची असते. लोकं बोलणारी बोलणारच आहेत. मी ते पहिल्यांदाच एक चॅलेंज म्हणून घेतलं. ते फोटोशूट लोकांसाठी बोल्ड होतं कारण त्यांनी मला कधी अशा कपड्यांमध्ये पाहिलं नव्हतं. पण, आम्ही कलाकार आहोत, हे करावं तर लागणार. डर्टी पिक्चरमध्ये तुम्ही विद्या बालनला बघू शकता किंवा तुम्ही देसी गर्लमध्ये प्रियांका चोप्रा जी साडी नेसली तो लूक पाहू शकता. आजही लोकांच्या डोक्यात ही इमेज नाही आहे, एखादी मुलगी जी थोडीशी फुल फिगर्ड आहे.ती असे कपडे घालू शकते तिला त्यांनी स्विकारलेलं नाही. मी त्या फोटोशूटसाठी मी प्रॉपर साडी गुंडाळली होती."