जाहिरातीला भुलला अन् फसला! 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्यासोबत घडलेलं असं काही...; सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:51 IST2025-10-10T16:29:59+5:302025-10-10T16:51:27+5:30
'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्यासोबत घडलेलं असं काही...; सांगितला 'तो' किस्सा

जाहिरातीला भुलला अन् फसला! 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्यासोबत घडलेलं असं काही...; सांगितला 'तो' किस्सा
Kapil Honrao: मराठी मालिकाविश्वात आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर एक वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे कपिल होनराव. गेली अनेक वर्षे तो नाटक, मालिकांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत त्याने साकारलेलं मल्हार नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. लवकरच तो एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचदरम्यान, कपिलने दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे.
नुकतीच कपिल होनरावने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत करिअमध्ये आलेल्या वाईट अनुभवांविषयी सांगितलं आहे. एका चुकीमुळे अभिनेत्याला त्याचे २०-२५ हजार रुपये गमावावे लागले होते. त्याबद्दल बोलताना कपिलने सांगितलं, "माझं महाविद्यालयीन शिक्षण लातूरला झालं. तेव्हा मला अभिनेता व्हायचंय ही इच्छा मनात कायम होती. खरंतर मला एनएसडीला जायचं होतं किंवा एफटीआय करायचं होतं. घरच्या मंडळींचा सपोर्ट नसल्यामुळे मुंबईला कसं जाता येईल याचा मार्ग काढावा लागला. मग मी डीएडच्या बहाण्याने मुंबईत आलो. भांडुपला माझं कॉलेज होतं. मग कॉलेजला जाण्याऐवजी कुठे ऑडिशन आहे का किंवा शूटिंग चाललंय का याबद्दल शोधायचो. तेव्हा फारसं या क्षेत्राबद्दल कळत नव्हतं. त्यावेळी सोशल मीडियाच तितका प्रभाव नव्हता. फेसबुकचीही फार क्रेझ नव्हती.
पुढे अभिनेत्याने म्हटलं की, "तेव्हा न्यूजपेपरमध्ये कामासाठी पाहिजेत, अशा जाहिराती यायच्या. त्या जाहिरातींनी एकदा गंडवलं पण होतं. एका ठिकाणी माझे २०-२५ घेतले आणि मला सिनेमात काम दिलं गेलं नाही, असाही सुरुवातीला अनुभव आला. पण, नंतर इंडस्ट्रीतील लोकांशी संपर्क वाढत गेला. "