क्रेझी मॅच! भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर शशांक केतकरने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 09:16 IST2025-08-05T09:11:42+5:302025-08-05T09:16:29+5:30
"या टीमची दृष्ट काढा...", भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर शशांक केतकरची प्रतिक्रिया; म्हणाला...

क्रेझी मॅच! भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर शशांक केतकरने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...
IND Vs ENG Match Shashank Ketkar Reaction : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना काल लंडनमधील 'द ओव्हल' येथे खेळवण्यात आला. अखेरच्या दिवशी ४ विकेट्स हातात असताना इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची गरज होती. इंग्लंडच्या बाजूनं झुकलेल्या सामन्यात पाचव्या दिवसाच्या खेळात मियाँ मॅजिक दिसलं अन् टीम इंडियानं २८ धावांत ४ विकेट्स घेत अविस्मरणीय विजय नोंदवला. दरम्यान, टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. त्याशिवाय अनेक सेलिब्रिटी टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला सपोर्ट करताना दिसत आहेत. अशातच आता भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतर आनंद भावना व्यक्त केल्या आहेत.
भारताच्या दमदार विजयानंतर शशांक केतकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये अभिनेत्याने म्हटलंय, "क्रेझी मॅच झाली. टेस्ट मॅच याआधी इतकी उत्सुकता वाढवणारी कधी पाहिली असेल मला आठवत नाही. टीम इंडियाला खरंच सलाम आहे. खरंच, या टीमची दृष्ट काढा. प्रत्येकाचा परफॉर्मन्स उत्तम होता. टेन्शनमुळे शूटिंग थांबवून आम्ही मॅच बघत होतो. शिवाय आज ज्यांनी इंग्लंडमध्ये एवढ्या एक दीड तासासाठी इंग्लंडमध्ये तिकीट काढलं असेल ना तर त्यांनी त्यांचा पैसा योग्य ठिकाणी खर्च केलाय."
पुढे अभिनेता म्हणाला, "मॅच बघताना थोडं टेन्शन होतं. मी पोझिशन बदलत नव्हतो. आम्ही एकाच जागी बसून होतो. त्यानंतर आम्हाला शॉटला बोलावल्यानंतर त्यांना सांगितलं की ही मॅच सोडू शकत नाही. थोडं थांबा. आय लव्ह यू टीम इंडिया. कमाल. मला तुमचा अभिमान आहे”, अशा पद्धतीने अभिनेत्याने त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, शशांक केतकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो मुरांबा मालिकेत पाहायला मिळतोय. या मालिकेमध्ये नवा अध्याय सुरु झालाय. मालिकेत सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षयचं नातंही नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे.