'लक्ष्मी निवास'मधील 'जयंत'ला मिळाली खऱ्या आयुष्यातील जान्हवी! 'ते' फोटो पाहून चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:09 IST2025-10-30T16:06:53+5:302025-10-30T16:09:32+5:30
अखेर 'लक्ष्मी निवास'मधील 'जयंत'ने दिली नात्याची कबुली, म्हणाला...

'लक्ष्मी निवास'मधील 'जयंत'ला मिळाली खऱ्या आयुष्यातील जान्हवी! 'ते' फोटो पाहून चर्चेला उधाण
Meghan Jadhav : छोट्या पडद्यावरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. एक कौटुंबिक कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. लक्ष्मी निवास आणि त्यांच्या मुली भावना, जान्हवी तसेच विणा , हरीश आणि जयंत ही पात्रे मालिकांरसिकांची लाडकी ठरली आहेत. या मालिकेत विकृत जयंतचं पात्र अभिनेता मेघन जाधवने साकारली आहे. सध्या हा अभिनेता चांगलाच चर्चेत आला आहे. लवकरच मेघन लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मेघन जाधवने त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर खास पोस्ट शेअर केली आहे. सध्या अभिनेत्याच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाल्याचंही माहिती मिळते आहे.मेघन जाधव सध्या मराठी मालिकांमधली लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरला डेट करत आहे.मेघनने तिच्यासोबतचे बरेच फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. त्याद्वारे अभिनेत्याने तिच्यावरचं प्रेमही व्यक्त केलं आहे. ते फोटो आणि व्हिडिओ पाहून ही गोड जोडी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं लक्षात येतंय. दरम्यान, या जोडीवर कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
अनुष्का पिंपुटकरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने 'आई मायेचं कवच','रंग माझा वेगळा' यांसारख्या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सध्या ती लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काम करताना दिसते आहे. तर मेघन जाधव लक्ष्मी निवास मालिकेमध्ये जयंत नावाची भूमिका साकारतो आहे. या दोघांनी रंग माझा वेगळा मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यांनी एकत्र मिळून फोटोग्राफीचा व्यवसाय सुरु केला होता. दरम्यान, रंग माझा वेगला मालिकेदरम्यान, त्यांचे सूर जुळले, असं म्हटलं जात आहे.