'नटीनं मारली मिठी' लोकप्रिय गाण्यावर 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याचा भन्नाट डान्स, चाहत्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:12 IST2025-06-27T11:10:26+5:302025-06-27T11:12:20+5:30

लोकप्रिय गाण्यावर 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याचा भन्नाट डान्स, चाहत्यांकडून कौतुक

marathi television actor man udu udu zhala fame ajinkya raut dance on natine marli mithi video viral  | 'नटीनं मारली मिठी' लोकप्रिय गाण्यावर 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याचा भन्नाट डान्स, चाहत्यांकडून कौतुक

'नटीनं मारली मिठी' लोकप्रिय गाण्यावर 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याचा भन्नाट डान्स, चाहत्यांकडून कौतुक

Ajinkya Raut Video: सध्या सोशल मीडियावर नवनवीन गाणी व्हायरल होत असतात. दिवसेंदिवस नवनवीन गाण्यांचा ट्रेंड देखील बदलत आहे. सोशल मीडियावर एखादं गाणं व्हायरल झालं की त्यावर अनेकजण रिल्स व्हिडीओ बनवताना दिसतात. मग कलाकारांनाही याचा मोह आवरत नाही. अशातच इन्स्टाग्रामवर 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊतचा (Ajinkya Raut) एक डान्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. सध्या सगळीकडे त्याच्या या व्हिडीओची चर्चा आहे. 


अभिनेता अजिंक्य राऊत हा सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो. त्यामाध्यमातून तो वेगवेगळे व्हिडीओ, फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. नुकताच अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याचा जबरदस्त डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो 'नटीनं मारली मिठी' गाण्यावर एका हॉटेल रुममध्ये भन्नाट डान्स करत सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्ही जर माझं हे रुप पाहिलंच नसेल तर तुम्ही अजून मला ओळखलेलं नाही. असं कॅप्शन अभिनेत्याने या व्हिडीओला दिलं आहे. 

अजिंक्यने शेअर केलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. शिवाय त्यांनी अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. त्याच्या व्हिडीओवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलंय "इंद्रजीतचा स्वॅग...", तसंच आणखी एका यूजरने म्हटलंय, "खूपच छान...". अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया .या व्हिडीओवर उमटल्या आहेत.

Web Title: marathi television actor man udu udu zhala fame ajinkya raut dance on natine marli mithi video viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.