चाहत्यांना धक्का! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडने सोशल मीडियावरून घेतला ब्रेक; काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:57 IST2025-11-09T11:45:55+5:302025-11-09T11:57:50+5:30
अभिनेता किरण गायकवाडचा मोठा निर्णय! सोशल मीडियाला केलं रामराम; कारण सांगत म्हणाला...

चाहत्यांना धक्का! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडने सोशल मीडियावरून घेतला ब्रेक; काय आहे कारण?
Kiran Gaikwad: 'देवमाणूस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड कायम चर्चेत असतो. या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली. दरम्यान, किरण गायकवाड त्याच्या मालिकांधील अभिनयासह सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओंमुळे देखील तितकाच चर्चेत असतो. सध्या अभिनेता अशाच एका पोस्टमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. किरणने नुकताच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. नेमकं त्याने या पोस्टमध्ये काय म्हटलंय जाणून घेऊयात...
दरम्यान, किरण गायकवाडने सोशल मीडियावर ब्रेक घेतला आहे. याबाबत खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.मात्र, किरणने अचानक हा एवढा मोठा निर्णय का घेतला, याबाबत त्याने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
किरणने पोस्टमध्ये काय म्हटलंय...
किरण गायकवाडने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, सोशल मिडिया चांगली आहे पण योग्य वेळ वापरत आली तर ,माझा खूप वेळ सोशल मीडिया वर जातोय असा लक्षात आला म्हणून जरा काही काळासाठी ( कायमचा नाही) माझ्या ऑफिशियल हँडल्स वरून रजा घेतोय… भेटूया लवकरच... खूप खूप प्रेम...", अशा आशयाची पोस्ट किरणने लिहिली आहे.
वर्कफ्रंट
किरण गायकवाडच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'लागिरं झालं', 'देवमाणूस' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने अभिनय केला आहे. सध्या देवमाणूस मालिकेचा मधला अध्यायमध्ये झळकतोय. त्याचबरोबर किरणने अनेक मराठी चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये चौक, फकाट आणि बघतोस काय मुजरा कर या चित्रपटांचा समावेश आहे.