'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट; पोस्ट शेअर करत सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 10:42 IST2025-05-01T10:39:10+5:302025-05-01T10:42:08+5:30

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळवली.

marathi television actor adish vaidya exit from aai baba retire hot aahet serial shared post | 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट; पोस्ट शेअर करत सांगितलं कारण

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट; पोस्ट शेअर करत सांगितलं कारण

Aai Baba Retire Hot Aahet : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम यांची मुख्य भूमिका आहे. त्याचबरोबर हरिश दुधाडे, प्रतीक्षा जाधव तसंच आदिश वैद्य आणि पालवी कदम हे कलाकार सुद्धा पाहायला मिळत आहेत. ही मालिका आता प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. त्यात आता या मालिकेसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. आई बाबा रिटायर होत आहेत मालिकेतून या लोकप्रिय अभिनेत्याने एक्झिट घेतली आहे.


दरम्यान, गेल्या वर्षी २ डिसेंबरला 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. आई-बाबा हे त्यांच्या जबाबदारीतून कधीच रिटायर होत नाही नकळतपणे ते जबाबदारीच्या चक्रव्ह्यूहात अडकून जातात. उडते असं या मालिकेचं कथन आहे. अशातच मालिकेत यशवंत किल्लेदार आणि शुभा किल्लेदार यांचा मुलगा मकरंदची भूमिका अभिनेता आदिश वैदने साकारली आहे. मात्र, आता आदिश वैद्य या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचं कळतंय. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत अभिनेत्याने माहिती दिली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आदिश वैद्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आई बाबा रिटायर होत आहेत मालिकेतून एक्झिट घेत असल्याचं त्याने म्हटलं आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, "आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मधून मकरंद किल्लेदार म्हणून निरोप घेत आहे. या प्रोजेक्टसह माझ्या प्रत्येक कामामध्ये खूप मेहनत घेतली आहे. पण मी माझ्या स्वतःच्या आत्मिक शांतीसाठी हा पर्याय निवडतो. खरं सांगायचं तर, माझ्या भूमिकेची मला सर्वात जास्त आठवण येईल. त्यासोबत सहकलाकार आणि क्रू मेंबर्स आहेत आणि सेटवर आमचा 'कालू' कुत्रा आहे, ज्याची मला आठवण येईल."

त्यानंतर अभिनेत्याने लिहिलंय, "यासाठी माझा विचार केल्याबद्दल @star_pravah, धन्यवाद. माझा स्वाभिमान अबाधित ठेवून आणि डोके उंच ठेवून कठोर परिश्रम करत राहीन आणि आणखी खूप मनोरंजक गोष्टी घेऊन येईन.तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. मी नेहमीच म्हणतो- तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची? मिलते है जल्दी ही...", अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे. 

Web Title: marathi television actor adish vaidya exit from aai baba retire hot aahet serial shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.