दापोलीमध्ये अक्षया-हार्दिकचा रोमॅण्टिक अंदाज; कलाकारांच्या प्रेमाची होतीये सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 12:05 IST2022-08-23T12:04:29+5:302022-08-23T12:05:23+5:30

Akshaya deodhar: या व्हिडीओमध्ये अक्षया, हार्दिकसोबत कोकण दौऱ्यावर गेल्याचं दिसून येत आहे.

marathi star Akshaya and Hardiks romantic video in Dapoli | दापोलीमध्ये अक्षया-हार्दिकचा रोमॅण्टिक अंदाज; कलाकारांच्या प्रेमाची होतीये सोशल मीडियावर चर्चा

दापोलीमध्ये अक्षया-हार्दिकचा रोमॅण्टिक अंदाज; कलाकारांच्या प्रेमाची होतीये सोशल मीडियावर चर्चा

'तुझ्यात जीव रंगला' म्हणत एकमेकांच्या प्रेमात पडलेली लोकप्रिय जोडी म्हणजे अक्षया देवधर (akshaya deodhar) आणि हार्दिक जोशी (hardeek joshi). पहिल्याच मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही जोडी सध्या सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला असून त्यांच्या घऱी लग्नाची गडबड सुरु झाली आहे. यामध्येच या जोडीने कोकणात जाऊन एक रोमॅण्टिक व्हिडीओ शूट केला आहे.

पाठक बाई म्हणजे अक्षया देवधर सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती कायम तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया, हार्दिकसोबत कोकण दौऱ्यावर गेल्याचं दिसून येत आहे.

अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती हार्दिकसोबत दापोलीमध्ये असल्याचं दिसून येत आहे. समुद्र किनारी ही जोडी रोमॅण्टिक झाली असून तिने वादळवाट या मालिकेचं शीर्षक गीत व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला प्ले केलं आहे. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ आणखीच सुंदर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, अक्षया बऱ्याचदा हार्दिकसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. सध्याच्या घडीला मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचं केळवण पार पडलं. त्यामुळे त्यांच्या घरी लग्नाच्या गडबडीला सुरुवात झाल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.
 

Web Title: marathi star Akshaya and Hardiks romantic video in Dapoli