"हिचे क्लिवेज किती डीप आहेत...", मराठी गायिकेला डॉक्टरचा अश्लील मेसेज, शेअर केला धक्कादायक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:01 IST2025-10-09T12:00:40+5:302025-10-09T12:01:27+5:30
गायिकेला चाहत्याकडून अश्लील मेसेज आला. ज्याने आधी कौतुक केलं त्याच चाहत्याने आनंदीला अश्लील मेसेज केला. हा मेसेज पाहून आनंदीला धक्का बसला आहे. हा संपूर्ण प्रकार गायिकेने इन्स्टाग्राम पोस्टमधून चाहत्यांना सांगितला आहे.

"हिचे क्लिवेज किती डीप आहेत...", मराठी गायिकेला डॉक्टरचा अश्लील मेसेज, शेअर केला धक्कादायक अनुभव
मराठीतील सुप्रसिद्ध गायिका आनंदी जोशीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. गायिकेला चाहत्याकडून अश्लील मेसेज आला. ज्याने आधी कौतुक केलं त्याच चाहत्याने आनंदीला अश्लील मेसेज केला. हा मेसेज पाहून आनंदीला धक्का बसला आहे. हा संपूर्ण प्रकार गायिकेने इन्स्टाग्राम पोस्टमधून चाहत्यांना सांगितला आहे. गायिकेला अश्लील मेसेज करणारा हा चाहता पेशाने डॉक्टर आहे.
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमधून प्रसिद्धी मिळवलेली गायिका आनंदी जोशी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आनंदी तिच्या चाहत्यांना अपडेट्स देत असते. नुकतंच तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पहिल्या स्टोरीमध्ये आनंदीने एका चाहत्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, "ही व्यक्ती गेल्या वर्षी माझ्या कॉन्सर्टमध्ये आली होती. माझ्यासोबत याने फोटो पोस्ट केला आहे. अनेकदा त्याने इन्स्टावर मेसेजमध्ये माझं कौतुकही केलं आहे". त्यानंतर तिने दुसरा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्या चाहत्याने आनंदीच्या स्टोरीला रिप्लाय केल्याचं दिसत आहे. "हिचे क्लिवेज बघ किती डीप आहेत", असा रिप्लाय चाहत्याने केल्याचं दिसत आहे. "आजची सकाळ या मेसेजने झाली", असं आनंदीने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
खरं तर त्या चाहत्याला हा मेसेज त्याच्या मित्राला पाठवायचा होता. पण, त्याने चुकून हा मेसेज आनंदीलाच पाठवला. त्यानंतर आनंदीने त्याला "तू चुकून मला मेसेज पाठवालास", असं म्हटल्यानंतर त्याने हा मेसेज डिलीट केल. पुढच्या स्टोरीमध्ये आनंदी म्हणते, "बरं झालं हे घडलं. कारण यामुळे मला ती व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करते आणि त्याचं उद्दीष्ट काय आहे हे कळलं. पण मला धक्का बसला आहे. हे फक्त त्याने मला काय मेसेज केला याबद्दल नाहीये. कारण ती व्यक्ती एक बालरोगतज्ञ आहे. (जो एका स्त्रीला व्यक्ती म्हणून पाहत नाही तर तिच्या शरीरावर कमेंटही करतो). त्याला मुलांना स्पर्श करण्याचा. शारीरिकरित्या तपासण्याचा अधिकार आहे. जे स्वत:चा बचाव करू शकत नाहीत किंवा बोलू शकत नाहीत. यामुळे मी घाबरले आहे".
"तुम्हाला जर असं वाटत असेल की अशा प्रकारच्या लोकांना किंवा त्यांच्या कमेंटकडे मी दुर्लक्ष करावं. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की असं जर केलं तर त्यांना वाटेल की त्यांचा वागणं हे बरोबर आहे. हे असे लोक आहेत ज्यांच्यामध्ये महिला, मुले आणि प्राण्यांविरुद्ध गुन्हे करण्याची क्षमता आहे. जर आपण त्यांच्या कृतींकडे लक्ष दिले तर आपण त्यांना ओळखू शकतो. आपण आपल्यासाठी संभाव्य धोका टाळू शकतो", असं पुढे तिने म्हटलं आहे.