ओम-स्वीटूच्या नात्यातील दुरावा होणार दूर? लवकरच ओमचं सत्य येणार समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 18:22 IST2021-10-01T18:21:32+5:302021-10-01T18:22:20+5:30
Yeu kashi tashi me nandayla: दादांचा जीव वाचवण्यासाठी ओम भर मांडवातून निघून जातो. त्यामुळे नायलाजाने स्वीटूला मोहितसोबत लग्न करावं लागतं.

ओम-स्वीटूच्या नात्यातील दुरावा होणार दूर? लवकरच ओमचं सत्य येणार समोर
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला. सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या ओम-स्वीटूच्या नात्यात दुरावा आला आहे. त्याचसोबत कमालीचे मतभेद वाढले आहेत.त्यामुळे प्रेक्षकांना आवडणारी ही जोडी सध्या मालिकेत एकमेकांपासून दुरावल्याचं दिसून येत आहे. मात्र, ओमचं सत्य लवकरच स्वीटू समोर येणार आहे.
सध्या सोशल मीडियावर 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वीटू ओमच्या आठवणीत रडत असून ओम नेमकं असं का वागतोय याचा प्रश्न तिला पडला आहे. त्यामुळे ऐन लग्नात ओम सोडून का गेला याचा शोध स्वीटूला घेणार की काय असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशोक सराफ यांच्यामुळे एकता कपूर झाली 'Tv queen'; जाणून घ्या ही भन्नाट स्टोरी
दरम्यान, दादांचा जीव वाचवण्यासाठी ओम भर मांडवातून निघून जातो. त्यामुळे नायलाजाने स्वीटूला मोहितसोबत लग्न करावं लागतं. स्वीटू आणि मोहितचं लग्न झाल्यामुळे या मालिकेला आता रंजक वळण आलं असून ओमचं सत्य स्वीटू समोर नेमकं कधी येणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.