अर्जुन अन् सायलीचं 'फ्रेंडमून', माथेरानमध्ये झालं 'ठरलं तर मग'चं शूटिंग; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 04:17 PM2024-01-22T16:17:37+5:302024-01-22T16:19:13+5:30

सायली आणि अर्जुन 'हनिमून' कम 'फ्रेंडमून'साठी माथेरानला गेले आहेत.

marathi serial tharla tar mag actors arjun and sayli shooting in matheran video viral | अर्जुन अन् सायलीचं 'फ्रेंडमून', माथेरानमध्ये झालं 'ठरलं तर मग'चं शूटिंग; Video व्हायरल

अर्जुन अन् सायलीचं 'फ्रेंडमून', माथेरानमध्ये झालं 'ठरलं तर मग'चं शूटिंग; Video व्हायरल

'स्टार प्रवाह' वरील सध्याची टॉपची मालिका 'ठरलं तर मग' मध्ये सायली आणि अर्जुनचा हनिमून सिक्वेन्स पाहायला मिळणार आहे. दोघांनीही कुठेतरी फिरायला जावं अशी अर्जुनच्या आईची इच्छा असते. शेवटी त्यांचा माथेरानचा प्लॅन ठरतो. सायली आणि अर्जुनचे माथेरानमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांची जोडी प्रेक्षकांच्या अतिशय लाडकी आहे. त्यामुळे आता त्यांच्या हनिमूनच्या फोटोवरही चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत. 

सायली आणि अर्जुन हनिमूनसाठी माथेरानला गेले आहेत. दोघांचा गुलाबी आऊटफिट असून तिथलं वातावरणही गुलाबी झालेलं दिसत आहे. सायलीने घोड्यावर बसण्याचा आनंदही लुटलेला दिसत आहे. तर अर्जुन डोक्यावर टोपी आणि गळ्यात मफलर अशा कूल लूकमध्ये दिसत आहे. माथेरान येथील सेल्फी पॉईंटवर त्यांचा सेल्फी घेतानाचा फोटोही व्हायरल होतोय. माथेरानच्या थंड वातावरणात जुई गडकरी (Jui Gadkari) आणि अमित भानुशाली (Amit Bhanushali) मालिकेच्या शूटिंगचा आनंद घेत आहेत. 

जुई गडकरी मूळची कर्जतचीच आहे. ती म्हणाली, "खूप मजा आली. सेटच्या बाहेर जाऊन आम्ही पहिल्यांदाच शूट केलं. मी मूळची कर्जतची आहे त्यामुळे अनेकदा माथेरानला फिरायला गेले आहे. लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. चाहतेही आम्हाला इथे भेटले. काहींची तर मालिकेत काम करण्याची इच्छाही माथेरान शूटिंगमुळे पूर्ण झाली आहे. खूप आपुलकीने आणि आदराने माथेरानला आमचं स्वागत झालं. खाण्यापिण्याची चंगळ होतीच पण मला सर्वात कौतुक वाटतं ते आमच्या टेक्निशियन्सचं. शूटिंगचा ताफा सांभाळताना त्यांची खरी कसरत होत होती. त्यांच्यामुळेही शूटिंग सुरळीत पार पडलं."

सायलीचा सुरुवातीला या ट्रीपला नकार असतो. मात्र आपण याला फ्रेंडमून म्हणूया असं सांगत तिचं मन वळवतो. सायली आणि अर्जुनच्या हनिमूनचा हा एपिसोड लवकरच प्रसारित होणार आहे. त्यांचे चाहते या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत.
 

Web Title: marathi serial tharla tar mag actors arjun and sayli shooting in matheran video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.