आशुतोषने अरुंधती समोर ठेवला 'हा' प्रस्ताव; देशमुख कुटुंबीय होईल का राजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 05:26 PM2021-11-16T17:26:42+5:302021-11-16T17:27:11+5:30

Aai kuthe kay karte: आशुतोष अरुंधतीसमोर एक प्रस्ताव ठेवणार आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावामुळे अरुंधतीच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.

marathi serial aai kuthe kay karte ashutosh give arundhati new proposal | आशुतोषने अरुंधती समोर ठेवला 'हा' प्रस्ताव; देशमुख कुटुंबीय होईल का राजी?

आशुतोषने अरुंधती समोर ठेवला 'हा' प्रस्ताव; देशमुख कुटुंबीय होईल का राजी?

googlenewsNext

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेल्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनेक रंजकदार ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनिरुद्धसोबत घटस्फोट घेतल्यानंतर एकट्या पडलेल्या अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या जुन्या मित्राची एन्ट्री झाली आहे. आशुतोष केळकर असं तिच्या मित्राचं नाव असून वरचेवर त्याच्या अरुंधतीसोबतच्या भेटी वाढल्या आहेत. ज्यामुळे अनिरुद्ध हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये  आशुतोष अरुंधतीसमोर एक प्रस्ताव ठेवणार आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावामुळे अरुंधतीच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. मात्र,  तो प्रस्ताव स्वीकारावा की नाही हा प्रश्न अरुंधतीला पडला आहे. 

समीर धर्माधिकारी नव्हे तर 'या' अभिनेत्याची होणार अरुंधतीच्या आयुष्यात एण्ट्री

व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये आशुतोष अरुंधतीला त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये एक गाणं गाण्याचा प्रस्ताव देणार आहे. मात्र, हा प्रस्ताव ऐकल्यावर घरातील सगळेच जण अचंबित होतात. कारण, अरुंधतीच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट पडणार आहे. 

दरम्यान, आता या मालिकेत पुढे नेमकं काय होणार हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना समजणार आहे. जर अरुंधतीने हा प्रस्ताव स्वीकारला तर तिच्या आयुष्यात कमालीची बदल होईल असं म्हटलं जात आहे. परंतु, अरुंधतीचा नेमका निर्णय काय असेल हे येत्या भागातच प्रेक्षकांना समजेल.
 

Web Title: marathi serial aai kuthe kay karte ashutosh give arundhati new proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.