मराठी कलाकार दाम्पत्याची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती! फोटो शेअर करत दाखवली पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:03 IST2025-11-12T10:57:35+5:302025-11-12T11:03:25+5:30
लग्नाच्या वाढदिवशीच नवीन घरात प्रवेश! मराठी कलाकार दाम्पत्याची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती, दाखवली पहिली झलक

मराठी कलाकार दाम्पत्याची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती! फोटो शेअर करत दाखवली पहिली झलक
Pushkar Sarad And Amruta Chandraprabha: मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी मागील काही दिवसांत मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये हक्कांचं घर घेत स्वप्नपूर्ण केलं. अलिकडेच अभिनेत्री अनुजा साठे, प्रियांका तेंडोलकर तसेच अभिनेता गुरु दिवेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मधुरा जोशी यांनी नवं घर घेतलं. या यादीत आता आणखी एका कलाकार जोडप्याचं नाव सामील झालं आहे. नुकतंच मराठी कलाविश्वातील एका सेलिब्रिटी जोडप्याचं हे स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. याची खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत या जोडप्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ही जोडी नेमकी कोण आहे, जाणून घेऊयात...
गेली अनेक वर्षे पुष्कर मराठी मालिकाविश्वात सक्रिय असणारे अभिनेता पुष्कर सरद आणि अभिनेत्री अमृता चंद्रप्रभा यांनी नुकताच त्यांच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला आहे.लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांनी नव्या घरात गृहप्रवेश केला. नुकताच सोशल मीडियावर पुष्कर आणि अमृता यांनी पोस्ट शेअर करत नव्या घराची पहिली झलक दाखवली आहे. त्यामध्ये या नवीन घरात त्यांनी विधीवत पूजा देखील केली.दरम्यान, नवीन घर घेतल्याने या जोडप्यावर मराठी कलाकारांसह त्यांच्या चाहतेमंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
पुष्कर सरदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'कट्टी बट्टी' या मालिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळाली होती. सध्या तो सन मराठीच्या 'सखा माझा पांडुरंग' मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तसेच स्टार प्रवाहच्या 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेतही त्याने काम केलं आहे. त्याचबरोबर अमृता 'बॉस माझी लाडाची','जय भवानी जय शिवाजी' यांसारख्या मालिकांमध्ये झळकली.