'मराठी बाणा'फेम अशोक हांडे यांना कार्यालयात घुसून मारहाण, आरोपी ताब्यात; नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 10:17 IST2026-03-05T10:16:33+5:302026-03-05T10:17:28+5:30

मारहाणीत अशोक हांडे जखमी झाले आहेत.

marathi bana fame ashok hande was beaten over parking issue mahim police arrest accused | 'मराठी बाणा'फेम अशोक हांडे यांना कार्यालयात घुसून मारहाण, आरोपी ताब्यात; नक्की काय घडलं?

'मराठी बाणा'फेम अशोक हांडे यांना कार्यालयात घुसून मारहाण, आरोपी ताब्यात; नक्की काय घडलं?

मराठी भाषेचा अभिमान 'मराठी बाणा'ने सांगणारे कलावंत, निर्माते अशोक हांडे यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पार्किंगच्या मुद्द्यावरुन झालेल्या वादात अशोक हांडेंना त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून एकाने मारहाण केली. ५३ वर्षीय व्यक्तीने त्यांना अक्षरश: बॅटने मारलं. या मारहाणीत अशोक हांडे जखमी झाले आहेत. माहीम पोलिस स्थानकात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ मार्च रोजी घडली. माटुंगा पश्चिम येथील मनमाला टँक रोडवर असलेल्या युनायटेड हाउसच्या तळ मजल्यावरील कार्यालयात अशोक हांडे बसले होते. यावेळी प्रथमेश पांडुरंग उनफोडे उर्फ बंटी ऑफिसमध्ये बॅट घेऊन पोहोचला. आधी त्याने ऑफिसमध्ये तोडफोड केली. आवाज ऐकून अशोक हांडे तिथे पोहोचले असता आरोपीने अशोक हांडेंकडे मराठी बाणाच्या च्या गाड्यांसाठीचे पार्किंगचे पैसे मागितले. मात्र त्या व्यक्तीचा पैसे मागण्याशी काहीच संबंध नसल्याने अशोक हांडेंनी नकार दिला. यामुळे रागात आरोपीने अशोक हांडेंना मारहाण केली. यात ते जखमी झाले आहेत. 

ही घटना घडली तेव्हा कार्यालयातील इतर लोक धावत आले. त्यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकण्याच्या मन:स्थिती नव्हता. मग कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना सूचना केली. पोलिस घटनास्थळी पोहोचलेले तेव्हा रागात असलेला आरोपी त्यांनाही जुमानत नव्हता. त्याने अपशब्दांचाही वापर केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

Web Title : 'मराठी बाणा' फेम अशोक हांडे पर हमला; आरोपी गिरफ्तार।

Web Summary : 'मराठी बाणा' के लिए जाने जाने वाले अशोक हांडे पर पार्किंग विवाद में उनके कार्यालय में हमला किया गया। 53 वर्षीय व्यक्ति ने बल्ले से हमला किया, जिससे उन्हें चोटें आईं। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है।

Web Title : 'Marathi Bana' fame Ashok Hande assaulted; accused arrested after office intrusion.

Web Summary : Ashok Hande, known for 'Marathi Bana', was assaulted in his office over a parking dispute. A 53-year-old man attacked him with a bat, causing injuries. The accused has been arrested after the police were called to the scene.