Video: वय केवळ आकडाच! वर्षा उसगांवकर अन् किशोरी शहाणेंचा 'हवा में उडती जाए'वर अफलातून डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 01:45 PM2021-12-16T13:45:00+5:302021-12-16T13:45:00+5:30

Varsha usgaonkar: वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघीही हवा में उडती जाए या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करतांना दिसत आहे.

marathi actress varsha usgaonkar and kishori shahane share dance video on hawa main udti jaye | Video: वय केवळ आकडाच! वर्षा उसगांवकर अन् किशोरी शहाणेंचा 'हवा में उडती जाए'वर अफलातून डान्स

Video: वय केवळ आकडाच! वर्षा उसगांवकर अन् किशोरी शहाणेंचा 'हवा में उडती जाए'वर अफलातून डान्स

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील ९० चा काळ अनेक गोष्टींसाठी स्मरणात राहणार आहे. या काळात मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्याच सोबत या काळात प्रत्येक कलाकाराने आपल्या सहज अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यातल्याच दोन अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर (varsha usgaonkar) आणि किशोरी शहाणे (kishori shahne). सौंदर्यासोबतच उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर या दोघींनीही त्या काळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे आजही या अभिनेत्री सिनेसृष्टीमध्ये सक्रीय आहेत. अलिकडेच या दोघींनी एका भन्नाट गाण्यावर डान्स केला आहे.

रुपेरी पडदा गाजवल्यानंतर आता या दोन्ही दिग्गज अभिनेत्रींनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे. किशोरी शहाणे अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करत आहेत. तर, वर्षा उसगावकर एका गाजलेल्या मराठी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. अलिकडेच या दोघींची एका सेटवर भेट झाली असून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघीही 'हवा में उडती जाए' या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करतांना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या डान्समधून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत  पुन्हा ते क्षण एन्जॉय केल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या व्हिडीओ व्यतिरिक्त त्यांनी आणखी एका व्हिडीओवर इन्स्टा रिल केलं आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे दोन्ही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
 

Web Title: marathi actress varsha usgaonkar and kishori shahane share dance video on hawa main udti jaye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.