हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 08:38 IST2025-12-04T08:36:45+5:302025-12-04T08:38:11+5:30
तेजस्विनीचा हळदी समारंभ पार पडला. याचे फोटो समोर आले आहेत.

हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
मराठी कलाविश्वात सध्या सनई चौघडे वाजत आहेत. पूजा बिरारी, प्राजक्ता गायकवाड यांच्यानंतर आता अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी लोणारी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. तेजस्विनीच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू असून लवकरच अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तेजस्विनी शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे सुपूत्र आणि युवानेते समाधान सरवणकर यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
नुकतंच तेजस्विनीचा हळदी समारंभ पार पडला. याचे फोटो समोर आले आहेत. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत तेजस्विनीला समाधान यांच्या नावाची हळद लागली. तेजस्विनीने हळदीसाठी खास पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर तिने फुलांची ज्वेलरी घालत तिने खास लूक केला होता. तिच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले आहेत. फोटोंमध्ये तेजस्विनी हळदीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचं दिसत आहे.

तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांचा ऑक्टोबर महिन्यात साखरपुडा पार पडला होता. तेजस्विनीच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्का होता. तेजस्विनी लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. समाधान यांच्याशी लग्न करत ती सरवणकर या राजकीय कुटुंबाची सून होणार आहे. तेजस्विनी लोणारीने आजवर अनेक मराठी चित्रपट, मालिकांमधून काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.