मराठी अभिनेत्रीने घेतली शानदार कार, किंमतही दमदार; व्हिडीओच शेअर केलाय, बघा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 17:17 IST2025-11-12T17:14:40+5:302025-11-12T17:17:13+5:30
मराठी सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने महागडी कार विकत घेतली आहे. सर्वांनी या अभिनेत्रीचं अभिनंदन केलंय

मराठी अभिनेत्रीने घेतली शानदार कार, किंमतही दमदार; व्हिडीओच शेअर केलाय, बघा!
मराठी अभिनेत्रीच्या घरी नवी पाहुणी आली असून तिने आलिशान गाडी घेतली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे तन्वी पालव. तन्वीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत शोरुममध्ये गाडी घेतानाचा आनंद व्यक्त केला आहे. तन्वी पालवने व्हिडीओ शेअर करताच तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करुन आनंद साजरा केला आहे. तन्वीने खरेदी केलेल्या गाडीची किंमत लाखोंच्या घरात आहे. जाणून घ्या सविस्तर
तन्वीने खरेदी केलेल्या गाडीची किंमत किती
मराठमोळी अभिनेत्री तन्वी पालवने Toyota Urban Cruiser Hyryder ही गाडी खरेदी केलीय. मिडनाईट काळ्या रंगाची तन्वीची ही गाडी दिसायला एकदम जबरदस्त आहे. तन्वीच्या या गाडीची किंमत १० ते १९ लाखांच्या घरात असल्याचं समजतंय. तन्वी आणि तिचा पती सिद्धार्थ मेननने ही शानदार गाडी खरेदी केली आहे. तन्वीचा नवरा सिद्धार्थ हा सुद्धा एक अभिनेता आहे. सिनेइंडस्ट्रीतील गेल्या अनेक वर्षांची मेहनत आणि जिद्द या जोरावर तन्वी आणि सिद्धार्थने हे स्वप्न पूर्ण केलंय. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी या सेलिब्रिटी जोडप्याचं अभिनंदन केलंय.
तन्वी पालव ही गेली अनेक वर्ष मराठी रंगभूमी, मालिका आणि जाहिरात क्षेत्रात काम करत आहे. तन्वीला 'आपण जावई विकत घेणे आहे' आणि 'शुभं करोती' यांसारख्या मराठी मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. याशिवाय 'रेड २' सारख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये आणि विविध हिंदी जाहिरातींमध्ये तिने काम केलंय. तन्वी एक प्रोफेशनल क्लासिकल डान्सरही आहे. तर तन्वीचा पती सिद्धार्थ मेनन हा गायक आणि अभिनेता असून त्याने शंकर महादेवनसारख्या मोठमोठ्या दिग्गजांसमोर काम केलंय.