स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत सुरुची अडारकरची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खूश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:07 IST2026-01-08T13:06:26+5:302026-01-08T13:07:03+5:30
आता पुन्हा एकदा सुरुची लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाहच्या मालिकेत सुरूची एन्ट्री घेणार असून या मालिकेचा नवा प्रोमोही समोर आला आहे.

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत सुरुची अडारकरची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खूश
'का रे दुरावा' या मालिकेतून अभिनेत्री सुरूची अडारकर घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. त्यानंतर सुरूची अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दिसली. आता पुन्हा एकदा सुरुची लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाहच्या मालिकेत सुरूची एन्ट्री घेणार असून या मालिकेचा नवा प्रोमोही समोर आला आहे. हा प्रोमो पाहून चाहते खूश झाले आहेत.
स्टार प्रवाहवरची 'मुरांबा' ही मालिका तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात रमा-अक्षयच्या नात्यात लवकरच नवं वळण येणार आहे. आता रमा-अक्षय नाही तर स्वरा-अक्षय ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अक्षयच्या आयुष्यात आलेली ही स्वरा दुसरी तिसरी कोणी नसून सुरुची अडारकर आहे. 'मुरांबा' मालिकेत सुरुची अडारकर स्वरा ही भूमिका साकारणार असून जवळपास १६ वर्षांनंतर ती स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे.
स्वरा या पात्राविषयी सांगताना सुरुची म्हणाली, "साधारण १६ वर्षांपूर्वी स्टार प्रवाहच्या ओळख या मालिकेने मला अभिनेत्री म्हणून खऱ्या अर्थाने ओळख दिली. पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या कुटुंबात येताना अतिशय आनंद होतोय. खरतर पॉझिटिव्ह व्यक्तिरेखा साकारायची होती आणि स्वरा या भूमिकेसाठी विचारणा झाली. स्वरा अतिशय सुंदर, हुशार आणि आत्मविश्वासू मुलगी आहे. प्रचंड हळवी असल्यामुळे तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. एकमेकांवर खरं प्रेम करणाऱ्या माणसांनी कधी दूर जाऊ नये असं स्वराचं मत आहे". स्वराच्या एन्ट्रीने रमा-अक्षयच्या नात्यात स्वराच्या येण्याने नेमकं काय घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.