सुरुचीचा 'नागिन' लूक पाहून काय होती पियुषची प्रतिक्रिया; म्हणाली, 'तो माझ्यासाठी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 17:00 IST2024-01-04T16:59:55+5:302024-01-04T17:00:46+5:30

सुरुची अडारकर लग्नानंतर लगेच मालिकेत झळकत आहे.

marathi actress Suruchi Adarkar naagin look in marathi serial what was piyush ranade s reaction | सुरुचीचा 'नागिन' लूक पाहून काय होती पियुषची प्रतिक्रिया; म्हणाली, 'तो माझ्यासाठी...'

सुरुचीचा 'नागिन' लूक पाहून काय होती पियुषची प्रतिक्रिया; म्हणाली, 'तो माझ्यासाठी...'

'का रे दुरावा' या गाजलेल्या मालिकेतून  घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुरुची अडारकर(Suruchi Adarkar). काही दिवसांपूर्वीच सुरुचीने अभिनेता पियुष रानडे  याच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सुरुचीने आणखी एक गुडन्यूज दिली आहे. तिने पुन्हा झी मराठीवर कमबॅक केलं आहे. सध्या गाजत असलेल्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत सुरुचीची एन्ट्री झाली आहे. तसंच मालिकेतील तिचा लुकही प्रचंड वेगळा आहे.

तितिक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर आणि अजिंक्य ननावरेची 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपी चार्टमध्येही मालिका टॉपवर असते. याच मालिकेत सुरुचीची एन्ट्री झाली असून तिचा चक्क नागीन लूक पाहायला मिळतोय. हा लूक पाहून पियुषची नक्की काय प्रतिक्रिया होती यावर सुरुची म्हणाली, 'हा लूक आत्ताच रिव्हील झाला आहे. इतक्या दिवसांपासून मी हे गुलदस्त्यातच होतं. लूक पाहून पियुषही खूश आहे. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं साकारायला मिळतंय म्हणून तोही माझ्यासाठी खूप खूश आहे. त्याचा मला कायम पाठिंबा आहेच.'

या पात्राबद्दल सुरूची म्हणाली, 'हे एक काल्पनिक पात्र आहे. माझाही हा पहिलाच प्रयत्न असणार आहे. प्रेक्षकांपर्यंत हे पात्र कसं पोहोचू शकेल यासाठी मी अभ्यासही केला आहे. आवाज, बॉडी लँग्वेज यावर काम केले आहे. आता प्रेक्षकांना आवडेल का याची उत्सुकता आहे.'

'का रे दुरावा’ या मालिकेतून सुरुची अडारकर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत सुरुचीसोबत सुयश टिळक मुख्य भूमिकेत होता. २०१४ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अखेर २०१६ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर सुरुचीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिका व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आता ‘का रे दुरावा’नंतर तब्बल ८ वर्षांनी ती पुन्हा एकदा झी मराठीवर पुनरागमन करायला सज्ज झाली आहे.

Web Title: marathi actress Suruchi Adarkar naagin look in marathi serial what was piyush ranade s reaction