'निक्की जायला हवी होती'; सुरेखा कुडचींचा अरबाजला सपोर्ट, म्हणाल्या - 'तो चांगला खेळत होता पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 12:22 IST2024-09-23T12:21:51+5:302024-09-23T12:22:36+5:30

अरबाज बाहेर गेल्यावर सुरेखा कुडचींनी त्याला सपोर्ट केला असून निक्कीवर नाराजी व्यक्त केली (bigg boss narathi 5)

marathi actress Surekha Kudchi supports Arbaz patel and oppose nikki tamboli bigg boss marathi 5 | 'निक्की जायला हवी होती'; सुरेखा कुडचींचा अरबाजला सपोर्ट, म्हणाल्या - 'तो चांगला खेळत होता पण...'

'निक्की जायला हवी होती'; सुरेखा कुडचींचा अरबाजला सपोर्ट, म्हणाल्या - 'तो चांगला खेळत होता पण...'

काल बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधून अरबाज पटेल घराबाहेर गेला. गेल्या आठवड्यात अरबाजसोबत निक्की, जान्हवी, वर्षाताई, सूरज हे पाच जण नॉमिनेट होते. यापैकी अरबाज पटेलला कमी मतं मिळाल्याने घराबाहेर जावं लागलंय. अरबाज गेल्याने निक्की ढसाढसा रडली. निक्की अक्षरशः खाली कोसळली. तेव्हा घरातील इतरांनी तिला सावरलं. अरबाज गेल्यावर बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धक सुरेखा कुडचींनी त्यांचं मत व्यक्त केलंय.

सुरेखा अरबाजबद्दल काय म्हणाल्या?

सुरेखा कुडचींनी सोशल मीडियावर अरबाज गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट केली. यात त्या लिहितात, "अरबाज घराबाहेर पडल्याचा आनंद बऱ्याच लोकाना झाला असला तरी मला वाटतं निक्की जायला हवी होती ... निक्की फक्त अरबाजच्या जीवावर नाचत होती ... अरबाज चांगला खेळत होता ... राग, चिडचिड हे सगळ त्या घरात होताच... पण तो चुकला ते निक्कीचा नादी लागून ...". सुरेखा कुडचींच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांना सपोर्ट केलाय.



अरबाजचा आठ आठवड्यांचा बिग बॉस प्रवास संपला

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये अरबाजची निक्की तांबोळीसोबत जास्त मैत्री झाली. परंतु यामुळे घरातील स्ट्रॉंग खेळाडू असलेला अरबाज गेममध्ये काहीसा वीक होत गेला. निक्कीसोबत असलेले रुसवेफुगवे संपूर्ण घराने बघितले. भाऊच्या धक्क्यावर रितेशने सुद्धा अरबाजची चांगलीच शाळा घेतली. अरबाज, वैभव, जान्हवी आणि निक्की यांचा एक ग्रुप होता. नंतर हा ग्रुप फुटला. शेवटपर्यंत कोणी कितीही बोललं तरीही अरबाज निक्कीसोबत होता. अखेर आठ आठवड्यांनी अरबाजला बिग बॉसमधून बाहेर जावं लागलं.

Web Title: marathi actress Surekha Kudchi supports Arbaz patel and oppose nikki tamboli bigg boss marathi 5