मराठमोळ्या अभिनेत्रीने लेकीसह केला लोकलने प्रवास, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 03:11 PM2024-03-17T15:11:32+5:302024-03-17T15:12:30+5:30

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा लेकीसह मुंबई लोकलने प्रवास, शेअर केला व्हिडिओ

marathi actress surabhi bhave travelled by mumbai local train with her daughter shared vidoe | मराठमोळ्या अभिनेत्रीने लेकीसह केला लोकलने प्रवास, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

मराठमोळ्या अभिनेत्रीने लेकीसह केला लोकलने प्रवास, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

अनेक मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारून अभिनयचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे. 'स्वामिनी' या कलर्स मराठीवरील मालिकेमुळे सुरभी प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेतील ऐतिहासिक भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. सुरभी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देत असते. 

सुरभीने नुकतंच तिच्या कुटुंबाबरोबर मुंबई लोकलने प्रवास केला. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत सुरभी पती आणि तिच्या लेकीबरोबर ट्रेनने प्रवास करताना दिसत आहे. "तिच्या पहिल्या लोकल जर्नीसाठी आम्ही खूप उत्सुक होतो...जेव्हा तिने खरी ट्रेन पाहिली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती," असं कॅप्शन सुरभीने या व्हिडिओला दिलं आहे. सुरभीच्या लेकीचं नाव सावनी असं आहे. लेकीबरोबरच्या सुरभीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

स्वामिनी मालिकेनंतर सुरभी अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली. 'भाग्य दिले तू मला', '३६ गुणी जोडी' या मालिकांमध्ये ती झळकली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ही अनोखी गाठ' या सिनेमातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. सुरभी सध्या 'राणी मी होणार' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

Web Title: marathi actress surabhi bhave travelled by mumbai local train with her daughter shared vidoe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.