संधी साधत दिग्दर्शक जवळ येत होता, मराठी अभिनेत्रीने असा शिकवला धडा; म्हणाली- "तो जवळ आला अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 15:48 IST2025-06-22T15:14:37+5:302025-06-22T15:48:11+5:30

कामाच्या निमित्ताने जवळीक साधणाऱ्या सहाय्यक दिग्दर्शकाला मराठी अभिनेत्रीने दिली तंबी, म्हणाली- "परत जवळ आला तर..."

marathi actress surabhi bhave recalled incident when assistant director try to touch her | संधी साधत दिग्दर्शक जवळ येत होता, मराठी अभिनेत्रीने असा शिकवला धडा; म्हणाली- "तो जवळ आला अन्..."

संधी साधत दिग्दर्शक जवळ येत होता, मराठी अभिनेत्रीने असा शिकवला धडा; म्हणाली- "तो जवळ आला अन्..."

Surabhi Bhave : कलाविश्वात काम करताना अभिनेता असो किंवा अभिनेत्री त्यांनाा चांगल्या-वाईट प्रसंगाना सामोरं जावं लागतं. हल्ली कास्टिंग काउचसारखे अनेक प्रकारही समोर येतात. त्यात मराठी कलाविश्वातील एका अभिनेत्रीने कामाच्या ठिकाणी आलेला वाईट अनुभवाविषयी सांगितलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे (Surabhi Bhave). अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने एका वाईट अनुभवाविषयी सांगितलं आहे.

नुकतीच अभिनेत्री सुरभी भावेने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान,कामाच्या ठिकाणी आलेल्या वाईट प्रसंगांवर भाष्य केलं. त्याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली, एक अभिनेता होता त्याचं एका शूटिंगच्या वेळी खूप वाईट पद्धतीने बघणं सुरु होतं. मग मी त्याला विचारलं काय झालं? माझ्याकडे असं का बघताय? त्यावर उत्तर देताना तो म्हणाला की, 'नाही मी माझ्या विचारात आहे.' मी तिथेच तो विषय सोडून दिला. त्यानंतर आता मी एक नाटक करत होते तेव्हा तोही माणूस तिथे आला होता. त्यावेळी दिग्दर्शकाला स्पष्टपणे सांगितलं की, मी काम करणार नाही. सध्या तो माणूस एका चांगल्या पदावर काम करतो आहे. पण, ते नाटक मी केलं कारण, त्यावेळी माझ्यासोबत वेगळे कलाकार होते. "

त्यानंतर आणखी एक किस्सा सांगत अभिनेत्री म्हणाली, " माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये एक सहाय्यक दिग्दर्शक होता. तो सारखा जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. त्याला मी म्हटलं की, हात नको लावू मला सांग कुठे काय आहे?  त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो परत जवळ आला मग मी स्पष्टच सांगितलं की 'परत हात लावला तर थोबाडीत देईन...'जे काही असेल तर दुरुन सांगायचं'. त्याला तंबी दिल्यानंतर त्या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीच मला म्हणाली होती की, तुला हे सगळं कसं जमतं? खरंतर, दुनियादारी अशा अनुभवांमधूनच शिकता आली. शिवाय त्यानंतर नशिबाने काम करताना मला फार वाईट अनुभव नाही आले, उत्तम माणसं भेटत गेली." असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

वर्कफ्रंट

अभिनेत्री सुरभी भावेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'राणी मी होणार', '36 गुणी जोडी' व 'सख्या रे' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.  तसंच अभिनेत्री काही चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत वल्लरी ही भूमिका साकारते आहे.

Web Title: marathi actress surabhi bhave recalled incident when assistant director try to touch her