सुप्रिया पाठारेच्या लेकाचं हॉटेल बंद; काही अडचणींमुळे घ्यावा लागला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 12:57 IST2023-11-19T12:56:24+5:302023-11-19T12:57:29+5:30

Supriya pathare: सुप्रिया पाठारे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

marathi actress supriya-pathare-son-hotel-maharaj again close | सुप्रिया पाठारेच्या लेकाचं हॉटेल बंद; काही अडचणींमुळे घ्यावा लागला निर्णय

सुप्रिया पाठारेच्या लेकाचं हॉटेल बंद; काही अडचणींमुळे घ्यावा लागला निर्णय

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सुप्रिया पाठारे हिच्या लेकाचं महाराज हॉटेल सातत्याने चर्चेत येत आहे. हे हॉटेल बंद झालं अशी मध्यंतरी चर्चा रंगली होती. परंतु, हे सत्य नसून हॉटेल सुरुच आहे असं सुप्रिया पाठारे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं होतं त्यामुळे सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. परंतु, आता खरंच काही अडचणींमुळे हे हॉटेल बंद करावं लागलं आहे. याविषयी सुप्रिया यांनी पोस्ट शेअर करत माहिती दिली.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सुप्रिया पाठारे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी महाराज हॉटेल काही काळासाठी बंद करण्यात येत आहे असं सांगितलं. मात्र, लवकरच हे हॉटेल सुरु होईल असं सुद्धा सांगितलं.

"काही अडचणी मुळे महाराज आपलं बंद आहे,लवकरच खवयेसाठी हजर होऊ,स्वामी चरणी हीच प्रार्थना, भेटूया लवकरच", असं सुप्रिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परंतु, अचानक हे हॉटेल का बंद करावं लागलं असा नवा प्रश्न खवय्यांना पडला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रियाच्या आईचं निधन झालं होतं. त्यामुळे काही दिवसांसाठी हे हॉटेल बंद ठेवण्यात आलं होत. त्यानंतर ३ नोव्हेंबरला हे हॉटेल पुन्हा खवय्यांच्या सेवेसाठी सज्ज झालं होतं. परंतु, यावेळी पुन्हा हे हॉटेल बंद झाल्याचं कळल्यानंतर सगळेच जण चक्रावून गेले आहेत.

Web Title: marathi actress supriya-pathare-son-hotel-maharaj again close