स्पृहा जोशीने लाडक्या बाप्पासाठी बनवले उकडीचे सुबक कळीदार मोदक, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 10:37 IST2024-09-08T10:36:50+5:302024-09-08T10:37:17+5:30

अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या लाडक्या बाप्पासाठी खास उकडीचे मोदक बनवले आहेत. 

Marathi actress Spruha Joshi made modak ganesh festival video viral | स्पृहा जोशीने लाडक्या बाप्पासाठी बनवले उकडीचे सुबक कळीदार मोदक, पाहा Video

स्पृहा जोशीने लाडक्या बाप्पासाठी बनवले उकडीचे सुबक कळीदार मोदक, पाहा Video

Spruha Joshi : गणेश चतुर्थीनिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे. घरोघरी बाप्पाचे अगदी थाटामाटात स्वागत झाले आहे.  मोदक हा बाप्पाचा आवडीचा नैवैद्य असतो.  दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान प्रत्येकाच्या घरी मोदक हमखास बनवले जातात. भले ते उकडीचे असो, किंवा नारळाचे मोदक. अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या लाडक्या बाप्पासाठी खास उकडीचे मोदक बनवले आहेत. 

स्पृहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "या वर्षातला हा सगळ्यात सुंदर क्षण आहे, गणपती बाप्पा मोरया". या व्हिडीओमध्ये स्पृहा ही मोदक बनवताना दिसत आहे. विशेष म्हणजे स्पृहाने स्वत:च्या हाताने मोदक तयार करताना त्याला छानशा कळ्याही पाडल्या आहेत. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. 


स्पृहाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तम अभिनयासह स्पृहा एक उत्तम निवेदिका आणि कवयित्रीदेखील आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही क्षेत्रामध्ये स्पृहाचा दांडगा वावर आहे. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. तर अलिकडेच ती  'सुख कळले' (Sukh Kalale) या मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला आली. 

Web Title: Marathi actress Spruha Joshi made modak ganesh festival video viral