स्पृहा जोशीची नवी मालिका 'सुख कळले', मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 11:31 IST2024-03-12T11:27:43+5:302024-03-12T11:31:02+5:30

नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी स्पृहा सज्ज झाली आहे. तिच्या नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे. 

marathi actress spruha joshi and sagar deshmukh new serial sukh kalale promo | स्पृहा जोशीची नवी मालिका 'सुख कळले', मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष

स्पृहा जोशीची नवी मालिका 'सुख कळले', मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष

स्पृहा जोशी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. 'उंच माझा झोका', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', 'लोकमान्य' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं. आता पुन्हा नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी स्पृहा सज्ज झाली आहे. तिच्या नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे. 

स्पृहा कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सुख कळले' असं स्पृहाच्या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. स्पृहाबरोबरच अभिनेता सागर देशमुख या मालिकेत मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये स्पृहा आणि सागर रिक्षातून उतरतात आणि स्पृहाची चप्पल तुटते. त्यानंतर सागर स्पृहाची चप्पल हातात घेऊन चालताना व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तर स्पृहा त्याची बॅग घेत त्याच्या खांद्यावरचा भार हलका करते. सुख कळले मालिकेच्या या रोमँटिक प्रोमोने मालिकेबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दरम्यान, स्पृहाने अभिनयाबरोबरच सूत्रसंचालनाची भूमिकाही उत्तमरित्या पार पाडली आहे. सूर नवा ध्यास नवा या रिएलिटी शोचं स्पृहा सूत्रसंचालन करायची. या भूमिकेतही प्रेक्षकांनी तिला पसंत केलं होतं. आता पुन्हा स्पृहा तिच्या अभिनयाची जादू नव्या मालिकेतून दाखवणार आहे. 

Web Title: marathi actress spruha joshi and sagar deshmukh new serial sukh kalale promo