'अजून खाली नेस बाई' बोल्ड साडीमुळे मराठी अभिनेत्री ट्रोल, म्हणाली, "काकू डोळ्यावरची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 10:59 IST2023-05-17T10:58:08+5:302023-05-17T10:59:03+5:30

तिच्या बोल्ड फोटोवर एका महिलेने कमेंट केली असून श्वेताने त्याच शब्दात महिलेला उत्तर दिलं आहे.

Marathi actress shweta kharat trolled for wearing bold saree replies back to trollers | 'अजून खाली नेस बाई' बोल्ड साडीमुळे मराठी अभिनेत्री ट्रोल, म्हणाली, "काकू डोळ्यावरची..."

'अजून खाली नेस बाई' बोल्ड साडीमुळे मराठी अभिनेत्री ट्रोल, म्हणाली, "काकू डोळ्यावरची..."

हिंदी कलाकार नेहमीच त्यांच्या फॅशनमुळे ट्रोल होताना दिसतात. आता मराठी सेलिब्रिटी सुद्धा ट्रोलर्सच्या कचाट्यात अडकत आहेत. सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, अमृता खानविलकर या मराठी अभिनेत्री अनेकदा त्यांच्या फॅशनमुळे ट्रोल झाल्या आहेत. तर आता 'मन झालं बाजिंद' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता खरात (Shweta Kharat) सध्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिच्या बोल्ड फोटोवर एका महिलेने कमेंट केली असून श्वेताने त्याच शब्दात महिलेला उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री श्वेता खरात सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने हिरवा ब्लाऊज आणि निळ्या साडीत एक बोल्ड फोटो  शेअर केला. श्वेताने यामध्ये साडी काहीशी खाली नेसली आहे. नेमकं हेच एका महिलेला खटकलं आणि कमेंट करत म्हणाली, "अजून खाली नेस बाई".

महिलेच्या या कमेंटवर श्वेताने तिथेच प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, नको “काकु “ ती तुमची speciality आहे , तुम्हीच नेसा bdw love you kaku"

आणखी एक कमेंट करत श्वेता म्हणाली, "काकू डोळ्यावरची आणि जमलं तर डोक्यातली सुद्धा जळमट काढा म्हणजे तुम्हालाही सुंदरता दिसेल आणि एवढा त्रास ही होणार नाही." श्वेताला कमेंट सेक्शनमध्ये घेरलं असतानाच तिचा सहकलाकार वैभव चव्हाणही मदतीला आला. त्याने काकूंची आणि इतर नेटकऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तो म्हणाला,"'अगं केसात काकूंसारखं एक फूल लावलं असत तर त्यांना नक्कीच आवडला असता फोटो.. सुंदर दिसते आहेस तू...काकू जरा जळत आहेत बाकी काही नाही.'

श्वेता आणि वैभव चव्हाण यांनी 'मन झालं बाजिंद' मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांची जोडी प्रेक्षकांची लाडकी होती. काही दिवसांपूर्वीच मालिकेने निरोप घेतला.

Web Title: Marathi actress shweta kharat trolled for wearing bold saree replies back to trollers