प्रथेप्रमाणे यंदाही ‘वर्षा'वरून आमंत्रण; मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतल्यावर श्रेया म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 15:14 IST2024-09-17T15:13:49+5:302024-09-17T15:14:31+5:30

विसर्जनाच्या आदल्या दिवशी श्रेया बुगडेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगलावर जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं (shreya bugde)

marathi actress shreya bugde visit cm eknath shinde varsha bunglow ganpati bappa | प्रथेप्रमाणे यंदाही ‘वर्षा'वरून आमंत्रण; मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतल्यावर श्रेया म्हणाली...

प्रथेप्रमाणे यंदाही ‘वर्षा'वरून आमंत्रण; मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतल्यावर श्रेया म्हणाली...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वर्षा बंगल्यावर दरवर्षी बाप्पाच्या दर्शनाला मराठी - हिंदी मनोरंजन विश्वातील  कलाकारांना आमंत्रण दिलं जातं. गेल्या वर्षी शाहरुख खान, सलमान खानसह 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांची टीम आणि इतरही कलाकार, गायकांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावली होती. आता यावर्षी अभिनेत्री श्रेया बुगडेला पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या घरी जायचा योग आला. श्रेयाने तिला आलेला अनुभव शेअर केलाय.

श्रेया बुगडेने सांगितला अनुभव

श्रेयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बाप्पांसोबतचे फोटो शेअर करुन लिहिलंय की, "प्रथेप्रमाणे यंदाही ‘वर्षा ’ वरून बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रण आले! आणि नेहेमीप्रमाणे खूप आनंद वाटला. मुख्यमंत्रीसाहेब व त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी, सहकार्यांनी आपुलकीने केलेला पाहुणचार कायम मनात राहतो! रुचकर मेजवानी , कलाकार मित्र मैत्रिणींची भेट,गप्पा आणि बाप्पाच्या आरतीचा मान खूप प्रसन्न वाटलं! ह्या सगळ्यासाठी साहेब तुमचे, तुमच्या सगळ्या कुटुंबियांचे ,सहकार्यांचे व वर्षावरील सर्व कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार! !!"


मुख्यमंत्र्यांच्या घरी कलाकार एकवटले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही वर्षांपासून मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकारांना आवर्जुन वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रण देत आहेत. यंदाही मुख्यमंत्र्यांच्या घरी मराठी मनोरंजन विश्वातील गौरव मोरे, श्रेया बुगडे, दत्तू मोरे, पृथ्वीक प्रताप या कलाकारांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्र्यांनी सर्व कलाकारांना वेळ देत त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. याशिवाय फोटो काढून सर्वांचा चांगला पाहुणचार केला

 

Web Title: marathi actress shreya bugde visit cm eknath shinde varsha bunglow ganpati bappa