आनंद, उत्साह अन् समाधान; अजिंक्य-शिवानी सुर्वेच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हिडीओ एकदा बघाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 13:21 IST2024-07-01T13:21:25+5:302024-07-01T13:21:56+5:30

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हिडीओ सध्या लोकांचं चांगलंच लक्ष वेधून घेतोय (shivani surve, ajinkya nanaware)

marathi actress shivani surve and actor ajinkya nanaware wedding video viral | आनंद, उत्साह अन् समाधान; अजिंक्य-शिवानी सुर्वेच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हिडीओ एकदा बघाच!!

आनंद, उत्साह अन् समाधान; अजिंक्य-शिवानी सुर्वेच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हिडीओ एकदा बघाच!!

शिवानी सुर्वे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. शिवानीला आपण विविध मालिका, सिनेमे अन् जाहिरातींमध्ये अभिनय करताना पाहिलंय. शिवानी सुर्वेने काहीच दिवसांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेसोबत लग्नगाठ बांधली. शिवानी-अजिंक्यच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली. व्हाईट ड्रेसकोड असलेले दोघांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले. आता नुकतंच शिवानीने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हाईट व्हिडीओ शेअर केलाय.

शिवानी-अजिंक्यच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हाईट व्हिडीओ

शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरे ही जोडी मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील जोडी. शिवानी सुर्वेने सोशल मीडियावर नुकतंच तिच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट आहे. व्हिडीओत पाहायला मिळतं शिवानीची वाजतगाजत एन्ट्री होते. अजिंक्य सुद्धा आनंदात दिसतो. पुढे अभिनेत्री मेघा घाडगे दोघांची गाठ बांधते. अजिंक्य-शिवानी सप्तपदी घेतात. लग्न लागल्यावर शिवानी-अजिंक्य जल्लोष साजरा करतात.

शिवानी-अजिंक्य यांचं लग्न आणि लव्हस्टोरी

अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी १ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. शिवानी-अजिंक्यची लव्हस्टोरीही खूप भन्नाट आहे. 'तू जीवाला गुंतवावे' मालिकेच्या सेटवर दोघांची मैत्री झाली. मालिका संपल्यानंतरही ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ६ वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अजिंक्य हा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. तर शिवानीची प्रमुख भूमिका असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका स्टार प्रवाहवर सुरु झालीय.

Web Title: marathi actress shivani surve and actor ajinkya nanaware wedding video viral