फुलांची सुंदर सजावट अन्...; शिवानी सोनारला लागली अंबरच्या नावाची हळद, लवकरच अडकणार लग्नबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:53 IST2025-01-20T15:51:41+5:302025-01-20T15:53:19+5:30
अभिनेत्री शिवानी सोनार अन् अंबर गणपुळे लवकरच अडकणार लग्नबंधनात.

फुलांची सुंदर सजावट अन्...; शिवानी सोनारला लागली अंबरच्या नावाची हळद, लवकरच अडकणार लग्नबंधनात
Shivani Sonar Halad: सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरु आहे. मागील काही दिवसांपासून अभिनेत्री शिवानी सोनार (shivani Sonar) आणि अंबर गणपुळेच्या (Ambar Ganpule) लग्नाची जोरदार चर्चा आहे. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना आता सुरुवात झाली आहे. साखरपुडा, संगीत आणि मेहंदी सोहळ्यानंतर आता शिवानी सोनारला अंबर गणपुळेच्या नावाची हळद लागली आहे.
शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे हे दोघेसुद्धा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय कलाकार आहेत. शिवानी सोनारने सोशल मीडियावर तिच्या हळदीचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील शिवानी-अंबरच्या लग्नाची उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्या २१ जानेवारीच्या दिवशी अंबर-शिवानी विवाहबंधनात अडकणार आहेत.
गेल्या वर्षी गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर ९ एप्रिल २०२४ या दिवशी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. अगदी काही महिन्यांपूर्वीच दोघांनीही मोठ्या दणक्यात त्यांची बॅचलर पार्टी साजरी केली. अखेर अंबर-शिवानीची लग्नघटिका आता समीप आली आहे.
वर्कफ्रंट
शिवानी सोनारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, 'राजा राणीची गं जोडी' 'तू भेटशी नव्याने' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर अंबर गणपुळे स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला होता.