मेकअपशिवाय आप्पीला कधी पाहिलंय का? पाहा, शिवानीचा नो मेकअप लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 18:45 IST2024-03-05T18:24:53+5:302024-03-05T18:45:49+5:30
Shivani Naik: शिवानीने अलिकडेच तिचा नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला. हा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.

मेकअपशिवाय आप्पीला कधी पाहिलंय का? पाहा, शिवानीचा नो मेकअप लूक
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे आप्पी आमची कलेक्टर. ही मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्यातच मालिकेतील मुख्य अभिनेत्री म्हणजेच शिवानी नाईक (Shivani Naik) ही तर सध्या अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर तिचा विदाऊट मेकअप फोटो व्हायरल झाला आहे.
आप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अभिनेत्री शिवानी नाईक अप्पी ही मुख्य भूमिका साकारत आहे. शिवानीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली असून सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे चाहते कायम तिच्याविषयीचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. यात शिवानी सुद्धा नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
दरम्यान, शिवानीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती विदाऊट मेकअप दिसत आहे. विशेष म्हणजे मेकअपशिवाय सुद्धा ती सुंदर दिसते. शिवानीचा नो मेकअप लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. सोबतच तिचं कौतुकही त्यांनी केलं आहे.