मालिकेत दोन वेण्यांमध्ये दिसणारी साधी 'रमा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 12:04 PM2023-10-31T12:04:22+5:302023-10-31T12:05:16+5:30

शिवानीचे चाहते तिचा व्हिडिओ पाहून प्रेमातच पडलेत.

marathi actress Shivani Mundhekar known for her role in muramba looks glamorous in real life | मालिकेत दोन वेण्यांमध्ये दिसणारी साधी 'रमा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, पाहा Video

मालिकेत दोन वेण्यांमध्ये दिसणारी साधी 'रमा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, पाहा Video

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'मुरांबा' सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेची हटके कथा आणि कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) अक्षय मुकादम ही भूमिका साकारत आहे तर नवोदित अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) रमा या भूमिकेत आहे. रमाचं पात्र नेहमीच दोन वेण्यात दिसलं आहे. मात्र ही भूमिका साकारणारी शिवानी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

शिवानी मुंढेकरने साकारलेली मालिकेतील रमा अतिशय सरळ, साधी दाखवली आहे. कमी शिकलेली पण व्यवहारज्ञान असलेली रमा म्हणजेच शिवानी तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. शिवानीची ही पहिलीच मालिका आहे. पदार्पणातच तिने मालिकेतून शशांक केतकरसोबत स्क्रीन शेअर केली आहे. शिवानी मालिकेत कितीही साधी दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती अत्यंत ग्लॅमरस आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे लक्षात येतं. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय. एका फ्युजन गाण्यावर तिने रील पोस्ट केलंय. बोल्ड ड्रेसमध्ये ती आरशासमोर व्हिडिओ शूट करतेय तर क्षणात तिचा साडीतील व्हिडिओ दिसतो. वेस्टर्न असो किंवा पारंपारिक शिवानी सुंदरच दिसते. 

शिवानीचे चाहते तिचा व्हिडिओ पाहून प्रेमातच पडलेत. तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवानी मूळची कराडची आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयात रस होता. तसंच तिला नृत्याचीही आवड आहे.  सध्या ती मुरांबा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Web Title: marathi actress Shivani Mundhekar known for her role in muramba looks glamorous in real life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.