एक वर्षाची झाली शर्मिष्ठा राऊतची लेक, अभिनेत्रीने पहिल्यांदाच दाखवली मुलीची झलक, मायलेकीचं खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:26 IST2026-01-16T15:25:18+5:302026-01-16T15:26:35+5:30

शर्मिष्ठा राऊतने गेल्या वर्षी चाहत्यांना आई झाल्याची गुडन्यूज दिली होती. आता शर्मिष्ठाची लेक एक वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीने लेकीसोबत खास फोटोशूट केलं असून पहिल्यांदाच तिचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. 

marathi actress sharmistha raut shared special post on duaghter 1st birthday | एक वर्षाची झाली शर्मिष्ठा राऊतची लेक, अभिनेत्रीने पहिल्यांदाच दाखवली मुलीची झलक, मायलेकीचं खास फोटोशूट

एक वर्षाची झाली शर्मिष्ठा राऊतची लेक, अभिनेत्रीने पहिल्यांदाच दाखवली मुलीची झलक, मायलेकीचं खास फोटोशूट

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती असलेली शर्मिष्ठा राऊत करिअरसोबत तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असल्याचं दिसतं. शर्मिष्ठा राऊतने गेल्या वर्षी चाहत्यांना आई झाल्याची गुडन्यूज दिली होती. लग्नानंतर साडेचार वर्षांनी शर्मिष्ठाच्या घरात पाळणा हलला होता. आता शर्मिष्ठाची लेक एक वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीने लेकीसोबत खास फोटोशूट केलं असून पहिल्यांदाच तिचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. 

शर्मिष्ठाने तिच्या लेकीचं नाव रुंजी असं ठेवलं आहे. रुंजी एक वर्षाची झाल्यानंतर मायलेकींनी खास फोटोशूटही केलं आहे. या फोटोशूटचा व्हिडीओ शर्मिष्ठाने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या व्हिडीओतून शर्मिष्ठाने रुंजीची झलक चाहत्यांना दाखवली आहे. "रुंजी... माझी परी पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. माझं प्रेम मी शब्दांत मांडू शकत नाही. वेळ किती पटकन निघून जाते. तू कालच आमच्या आयुष्यात आलीस असं वाटत असतानाच आज १ वर्षांची झालीस. तुझ्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी कायमच प्रार्थना करेन. खूप खूप प्रेम रुंजी", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


शर्मिष्ठा राऊतने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  अभिनेत्रीने तेजस देसाईशी लॉकडाउनमध्ये लग्न केले होते. ऑक्टोबर २०२०मध्ये लग्न करून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं होतं. 

Web Title : शर्मिष्ठा राऊत की बेटी एक साल की, अभिनेत्री ने दिखाई पहली झलक।

Web Summary : मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत की बेटी रुंजी का पहला जन्मदिन मनाया गया। शर्मिष्ठा ने एक विशेष फोटोशूट साझा किया, जिसमें पहली बार प्रशंसकों को रुंजी का चेहरा दिखाया गया। अभिनेत्री ने लॉकडाउन के दौरान तेजस देसाई से शादी की और पिछले साल अपनी बेटी का स्वागत किया।

Web Title : Sharmishtha Raut's daughter turns one; actress reveals first glimpse.

Web Summary : Marathi actress Sharmishtha Raut's daughter, Runji, celebrated her first birthday. Sharmishtha shared a special photoshoot, revealing Runji's face to fans for the first time. The actress married Tejas Desai during lockdown and welcomed their daughter last year.