सेटवर अभिनेत्याने चुकीचा स्पर्श केला अन्...; मराठी अभिनेत्रीने 'अशी' घडवली अद्दल, प्रसंग सांगत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 17:09 IST2026-02-07T17:07:10+5:302026-02-07T17:09:32+5:30

"पाठीवरून विचित्र पद्धतीने हात...",सेटवर मराठी अभिनेत्रीसोबत सहकलाकाराने केलेलं गैरवर्तन, म्हणाली-"मी ७० लोकांसमोर त्याला..." 

marathi actress sharmishta raut share horrible incident says actor touch him badly | सेटवर अभिनेत्याने चुकीचा स्पर्श केला अन्...; मराठी अभिनेत्रीने 'अशी' घडवली अद्दल, प्रसंग सांगत म्हणाली...

सेटवर अभिनेत्याने चुकीचा स्पर्श केला अन्...; मराठी अभिनेत्रीने 'अशी' घडवली अद्दल, प्रसंग सांगत म्हणाली...

Marathi Actress Sharmishta Raut: मनोरंजनविश्वात काम करत अनेकदा कलाकारांना चांगले वाईट अनुभव येत असतात. अभिनय क्षेत्रातील बऱ्याच अभिनेत्रींनी करिअरमध्ये त्यांना आलेल्या अशा अनुभवांबद्दल खुलासा केला आहे. अशातच मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने एका मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीला तिला आलेल्या वाईट अनुभवांविषयी सांगितलं आहे.

शर्मिष्ठा राऊत हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये अभिनेत्रीने काम केलं आहे. शर्मिष्ठा केवळ एक अभिनेत्रीच नव्हे तर ती निर्मातीदेखील आहे.नुकतीच शर्मिष्ठाने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शर्मिष्ठा म्हणाली, "मी ही घटना आधी सांगितली आहे की, नाही ते मला आठवत नाहीये. मी एक शो करायचे. इंडस्ट्रीत पदार्पण केल्या केल्या शो केला. मी त्या कार्यक्रमाचं आणि निर्मात्यांचं नाव घेणार नाही कारण ते खूप चांगले आहेत. तिकडे एक अभिनेते होते ते ज्या पद्धतीने मी सेटवर आल्यावर मला ग्रीट करायचे ते मला समजत होतं की चुकीचं आहे. त्यावेळी मी खूप प्रसिद्ध अभिनेत्रीही नव्हते. माझी अगदीच सुरुवात होती. ते ज्या पद्धतीने मला ग्रीट करायचे, मला समोरून मिठी मारायचे. तेव्हा मला त्यांचा स्पर्श कळायचा. मला कळायचं की, हा स्पर्श चुकीचा आहे. पाठीवरून एक विचित्र हात फिरवायचे.

मग शर्मिष्ठा म्हणाली,"तेव्हा माझं असं झालेलं की आताच आलोय आणि काहीच माहित नाहीये. हे घरीही जाऊन सांगता येणार नाही. त्यांनाही टेन्शन येणार. मी कसं बोलू? मला कळत नव्हता. हे दोन-तीनदा त्या सेटवर तसंच झालं . मग मी एक दिवशी ठरवलं की, मी बोलणार. जास्तीत जास्त काय होईल आपण इंडस्ट्रीतून बाहेर होऊ. आउट झालो तरी, माझ्याकडे डिग्री आहे. मी पंधरा ते वीस हजाराची नोकरी कमावू शकते.मला काही गोष्टींवर बोललंच पाहिजे.हेच मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलं आहे.त्यानंतर पुन्हा एकदा ते सेटवर मला मिठी मारायला आले 'अरे हाय म्हणून. तेव्हा मी त्यांना म्हटलं 'सर मी घातलीय तर त्यांना कळलं नाही, मी काय बोलतेय तेव्हा मी त्यांना म्हटलं 'सर चेक करू नका मी माझे अंतर्वस्त्र घातलेले आहेत.' इतकं धडधडीत मी ७० लोकांसमोर मोठ्यांदा बोलले."

जर कोणाबरोबर चुकीचं घडत असेल तर...

"त्यानंतर त्यांनी पुन्हा असं कधीच केलं नाही. ते मी आले की समोरही यायचे नाहीत. आले तरी साईडला जायचे. ही गोष्ट मी कधी घरीही सांगितली नाही कारण मला कळायचं नाही सांगू की नको. पण मी बाहेर बोलून मोकळी झाले होते. मला असं वाटतं की, ही निर्णय घेण्याची क्षमता, हा स्पष्टवक्तेपणा मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाला आहे. आणि जर कोणाबरोबर असं काही घडत असेल तर त्याच क्षणी या प्रवृत्तीला ठेचा. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही."

Web Title : अभिनेत्री ने सेट पर गलत स्पर्श के लिए अभिनेता का सामना किया, सुनाई आपबीती।

Web Summary : मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ने एक पुरानी घटना का खुलासा किया जिसमें एक अभिनेता ने सेट पर उनसे गलत तरीके से छुआ। उन्होंने सीधे तौर पर उसका सामना किया, जिसके बाद वह उससे बचने लगा। वह दूसरों को भी ऐसी हरकतों के खिलाफ तुरंत बोलने के लिए प्रोत्साहित करती हैं।

Web Title : Actress confronts actor for inappropriate touch on set, shares ordeal.

Web Summary : Marathi actress Sharmishta Raut revealed a past incident where an actor inappropriately touched her on set. She confronted him directly, making him avoid her afterward. She encourages others to speak out against such behavior immediately.