"अमुक पक्ष किंवा व्यक्ती राज्यात पॉवरमध्ये कशी काय?", BMC निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्रीची सुचक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 15:05 IST2026-01-17T15:02:29+5:302026-01-17T15:05:25+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्रीने सूचक पोस्ट शेअर केली आहे. 

marathi actress sharmila shinde shared criptic post after bmc election | "अमुक पक्ष किंवा व्यक्ती राज्यात पॉवरमध्ये कशी काय?", BMC निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्रीची सुचक पोस्ट

"अमुक पक्ष किंवा व्यक्ती राज्यात पॉवरमध्ये कशी काय?", BMC निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्रीची सुचक पोस्ट

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान झालं. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी या निवडणुकांचे निकालही लागले. मुंबई महापालिकेतही महायुती सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेत भाजपला ८९ तर शिंदेंच्या शिवसेनेला २९ जागांवर विजय मिळवता आला. महायुतीचे एकूण ११८ उमेदवार विजयी झाल्याने त्यांनी बहुमताचा आकडा गाठला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्रीने सूचक पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, "माझ्या देशात सगळ्यात जास्त चुकीचा वाटणारा शब्द आहे पॉवर. अमुक पक्ष किंवा व्यक्ती देशात/ राज्यात पॉवरमध्ये आहे कशी काय? कुठल्याही लोकशाहीमध्ये जर कुणी पॉवरमध्ये असतं तर ती फक्त आणि फक्त जनता असते. बाकी सगळे आपण दिलेल्या पगारावरती काम करणारे जनतेचे सेवक आहेत. माझ्या घरी स्लायडिंग विंडोचं काम करायला आलेल्या व्यक्तीला मी सांगते की मला विंडो कशी हवी आहे. तो नाही ठरवत की विंडो कशी असेल किंवा तो पैसे घेऊन विंडो बनवणारच नाही आहे". शर्मिलाने केलेली ही पोस्ट व्हायरल झाली आहे. 


शर्मिला शिंदे हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'पुढचं पाऊल' या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर 'माझ्या नवऱ्याची बायको', 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकांमध्ये ती दिसली होती. आता सध्या ती 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

Web Title : बीएमसी चुनाव नतीजों के बाद अभिनेत्री ने राजनीतिक शक्ति पर सवाल उठाया

Web Summary : बीएमसी चुनाव नतीजों के बाद, अभिनेत्री शर्मिला शिंदे ने लोकतंत्र में 'शक्ति' की अवधारणा पर सवाल उठाया, निर्वाचित अधिकारियों पर जनता की भूमिका पर जोर दिया। वह उन्हें जनता द्वारा भुगतान किए गए सेवक के रूप में देखती हैं।

Web Title : Actress questions political power after BMC election results

Web Summary : Following BMC election results, actress Sharmila Shinde questioned the concept of 'power' in democracy, emphasizing the public's role over elected officials. She sees them as servants paid by the people.