धर्माधिकाऱ्यांच्या आयुष्यात नवं वादळ! 'कोण होतीस तू...', मालिकेत 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, साकारणार 'हे' पात्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 18:53 IST2025-12-23T18:49:17+5:302025-12-23T18:53:17+5:30
कोण होतीस तू...', मालिकेत 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती?

धर्माधिकाऱ्यांच्या आयुष्यात नवं वादळ! 'कोण होतीस तू...', मालिकेत 'या' लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, साकारणार 'हे' पात्र
Kon Hotis Tu kay Jhalis Tu Serial: 'कोण होतीस तू, काय झालीस तू' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अभिनेता मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचा प्रेक्षकवर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांनी साकारलेली कावेरी-यशची ही जोडी अनेकांना भावली आहे. या मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळे कथानक आणखी रंजक बनत चाललं आहे. अशातच आता या मालिकेत एक नवीन ट्वि्स्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतोय.
सध्या 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत मंदार जाधव दुहेरी भूमिकेत पाहायला मिळतोय. मालिका आता रंजक वळणावर आली आहे. एका अपघातात कावेरीच्या नवऱ्याचा म्हणजेच यशचा मृत्यू होता आणि त्यांच्यानंतर धर्माधिकाऱ्यांच्या घरात युगची एन्ट्री झाली आहे. युग हा हुबेहुब यशसारखा दिसत असला तरी त्यांचे स्वभाव एकमेकांपेक्षा फार वेगळे आहेत. युगनंतर आता मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. फिल्मी स्टाईलने वावरणाऱ्या युगची आई आता धर्माधिकाऱ्यांच्या घरी पोहोचली आहे. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री सीमा देशमुख साकारत आहेत. मनात सुडाची भावना घेऊन धर्माधिकाऱ्यांच्या घरी पोहोचली युगचीही आई आल्याने आता मालिकेत कोणतं नवं वळण पाहायला मिळेल, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
अभिनेत्री सीमा देशमुख या मराठी मनोरंजनविश्वातील नावजलेल्या अभिनेत्रींपकी एक आहेत. सीमा देशमुख यांनी आजवर अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्या जारण या मराठी चित्रपटात झळकल्या. त्याशिवाय पिंगा गं पोरी पिंगा मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका वठवली.