'मालवाणी चेडू chilling in मालवण'; ऋतुजा बागवेचा व्हेकेशन मूड ऑन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 19:09 IST2023-05-12T19:08:32+5:302023-05-12T19:09:12+5:30
Rutuja bagwe: ऋतुजा सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या गावी मालवणमध्ये गेले आहे.

'मालवाणी चेडू chilling in मालवण'; ऋतुजा बागवेचा व्हेकेशन मूड ऑन
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे(Rutuja Bagwe). नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तीनही माध्यमांमध्ये तिचा वावर आहे. त्यामुळे तिची लोकप्रियताही तितकीच असल्याचं दिसून येतं. सध्या ऋतुजा तिचा व्हेकेशन टाइम एन्जॉय करत असून येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
ऋतुजा सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या गावी मालवणमध्ये गेले आहे. येथील एका बीचवरचा फोटो तिने शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टी शर्ट आणि शॉर्ट जीन्स परिधान केली आहे.
दरम्यान, ऋतुजा तिच्या कुटुंबीयांसह मालवणमध्ये गेले आहे. तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून लक्षात येतं. ऋतुजाने 'नांदा सौख्य भरे', चंद्र आहे साक्षीला अशा कितीतरी मालिकांमध्ये काम केलं आहे.