Ruchira Jadhav : “अजून किती वर्ष हिच शॉर्ट पँट घालणार ?” ट्रोल करणाऱ्याला रूचिरा जाधवचं कडक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 11:14 AM2023-02-26T11:14:33+5:302023-02-26T11:17:32+5:30

Ruchira Jadhav : रुचिरा जाधवने एक योगा व्हिडीओ शेअर केला. पण या व्हिडीओनंतर काही जणांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. एका ट्रोलरने रूचिराच्या कपड्यांवर कमेंट केली.

Marathi Actress Ruchira Jadhav Answer Trollers For Wearing This Same Shorts | Ruchira Jadhav : “अजून किती वर्ष हिच शॉर्ट पँट घालणार ?” ट्रोल करणाऱ्याला रूचिरा जाधवचं कडक उत्तर

Ruchira Jadhav : “अजून किती वर्ष हिच शॉर्ट पँट घालणार ?” ट्रोल करणाऱ्याला रूचिरा जाधवचं कडक उत्तर

googlenewsNext

अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे रुचिरा जाधव हे नाव आताश: घराघरात पोहोचलं आहे. 'बिग बॉस मराठी ४' नंतर तर तिच्या लोकप्रियतेत आणखीच वाढ झाली आहे. हिच रूचिरा सध्या वेगळ्या कारणानं चर्चेत आहे.
रूचिरा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे. स्वत:चे राेज नवे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. नुकताच तिने एक योगा व्हिडीओ शेअर केला. पण या व्हिडीओनंतर काही जणांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. एका ट्रोलरने रूचिराच्या कपड्यांवर कमेंट केली. या ट्रोलरला रूचिराने खरमरीत उत्तर दिलं.

रूचिराने इन्स्टाग्रामवर योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला. यावेळी तिने ब्रालेट आणि ब्लॅक कलरची शॉर्ट पँट परिधान केली होती. तिच्या या पँटवरुन एका ट्रोलरने तिला डिवचण्याचा प्रयत्न केला.  'किती वर्षापासून तू हीच शॉर्ट पँट घालत आहेस?’अशी कमेंट या ट्रोलरने केली. रूचिराने या ट्रोलरला चांगलंच सुनावलं.

'कदाचित गेल्या वर्षभरापासून मी ही पँट परिधान करतेय आणि आणखी पुढची २० वर्षे मी ती सहज घालू शकते. कारण मला २० वर्षांनंतरही मला ती फिट येईन, याची मला खात्री आहे. ही सर्व पॉवर योगाची कमाल आहे. एक सल्ला तुम्हालाही देते, तुम्हीही योगा करा, हे निरोगी शरीर आणि निरोगी मनासाठी उत्तम आहे,' असं रुचिराने या ट्रोलरला सुनावलं.

रूचिरा जाधव ही मराठी इंडस्ट्रीची बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नुकत्याच संपलेल्या बिग बाॅसच्या चौथ्या पर्वात रूचिराने बिग बॉसचं घर दणाणून सोडलं होतं.  'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत तिने मायाची भूमिका साकारली होती. या मालिकेने तिला खरी ओळख दिली. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा काही मालिकांमध्येही ती झळकली.   

Web Title: Marathi Actress Ruchira Jadhav Answer Trollers For Wearing This Same Shorts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.