आधी प्रेग्नंसी अन् आता... 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने दिली आणखी एक गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 16:21 IST2023-07-25T16:20:50+5:302023-07-25T16:21:26+5:30

सध्या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

marathi actress radha sagar shared one more good news bought new house with husband | आधी प्रेग्नंसी अन् आता... 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने दिली आणखी एक गुडन्यूज

आधी प्रेग्नंसी अन् आता... 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने दिली आणखी एक गुडन्यूज

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री राधा सागरने  (Radha Sagar) काही दिवसांपूर्वीच गरोदर असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. राधाच्या डोहाळजोवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या ती प्रेग्नंसीचा काळ एन्जॉय करत आहे. दरम्यान राधाने आता आणखी एक गुडन्यूज देत चाहत्यांना खूश केलं आहे. काय आहे ती गुडन्यूज?

राधाचं सागर कुलकर्णीसह लग्न झालं आहे. तर हे गोड कपल लवकरच आई बाबा होणार आहेत. शिवाय आता राधाने नवऱ्यासोबत मिळून आणखी एक गुडन्यूज शेअर केली आहे. त्यांनी नवीन घर घेतलं असून 'होम टूर' चा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय. या माध्यमातून तिने गुडन्यूजचा डबल डोस दिला आहे. या घरासोबत राधाचं नवीन घराचं स्वप्न पूर्ण झालंय.'होम स्वीट होम' असं कॅप्शनही तिने व्हिडिओला दिलंय.

राधावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सध्या तिने अभिनयातून ब्रेक घेतला असून ती आपल्या आरोग्यावर लक्ष देत आहे. राधाने लोकप्रिय 'आई कुठे काय करते' मालिकेत भूमिका साकारली होती. अभिषेकच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत ती दिसली होती. राधाला अभिनयाव्यतिरिक्त डान्सचीही आवड आहे. तसंच ती संजय लीला भन्साळींच्या 'मलाल' सिनेमातही झळकली आहे.

Web Title: marathi actress radha sagar shared one more good news bought new house with husband