श्वेता जितकी बोल्ड तितकीच साधी आहे तिची आई; तुम्ही पाहिलं का तिच्या माऊलीला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 18:21 IST2023-08-09T18:21:01+5:302023-08-09T18:21:32+5:30

Shweta shinde:श्वेताची आई प्रचंड साधी आणि सोज्वळ असल्याचं दिसून येतं.

marathi actress producer shweta shinde mother photo viral on social media | श्वेता जितकी बोल्ड तितकीच साधी आहे तिची आई; तुम्ही पाहिलं का तिच्या माऊलीला?

श्वेता जितकी बोल्ड तितकीच साधी आहे तिची आई; तुम्ही पाहिलं का तिच्या माऊलीला?

मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे (Shweta Shinde). आजवर श्वेताने अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या मालिकांची निर्मिती केली आहे. लागिरं झालं जी, देवमाणूस या तिच्या मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजल्या. विशेष म्हणजे उत्तम कथानकासह मालिका सादर करणारी श्वेता खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. परंतु, यावेळी ती तिच्या आईमुळे चर्चेत आली आहे.

श्वेता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यातील घडामोडी, घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच मदर्स डे निमित्त तिने तिच्या आईसोबतचा फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

श्वेताची आई प्रचंड साधी आणि सोज्वळ असून त्यांचा फोटो पाहिल्यावर लगेच लक्षात येतं. इतकंच नाही तर पाठीशी आई खंबीरपणे उभी होती म्हणूनच श्वेताने इतपर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पार केला आहे.श्वेताची आईदेखील एक यशस्वी उद्योजिका आहे. बऱ्याचदा श्वेतादेखील तिच्या आईविषयी व्यक्त होत असते. इतकंच नाही तर अनेकदा तिची आईसुद्धा तिला मालिकांसाठी विषय सुचवते. दरम्यान, सध्या श्वेताची शेतकरी नवरा हवा ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु आहे. या मालिकेचा विषय तिच्या आईने तिला सुचवला आहे.

Web Title: marathi actress producer shweta shinde mother photo viral on social media