प्रियदर्शनी इंदलकरला विदाऊट मेकअप तुम्ही ओळखू शकता का?; पाहा तिचा नो मेकअप लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 12:15 PM2023-04-27T12:15:58+5:302023-04-27T12:17:04+5:30

Priyadarshini Indalkar: सध्या सोशल मीडियावर प्रियदर्शनीचा विदाऊट मेकअप असलेला फोटो व्हायरल होत आहे.

marathi actress Priyadarshini Indalkar no makeup look | प्रियदर्शनी इंदलकरला विदाऊट मेकअप तुम्ही ओळखू शकता का?; पाहा तिचा नो मेकअप लूक

प्रियदर्शनी इंदलकरला विदाऊट मेकअप तुम्ही ओळखू शकता का?; पाहा तिचा नो मेकअप लूक

googlenewsNext

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रियदर्शनीने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. मध्यंतरी प्रिदर्शनी, अभिनेता ओंकार राऊतमुळे चर्चेत आली होती. या चर्चा थांबत नाहीत त्यातच आता तिची नवीन चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया सध्या प्रियदर्शनीचा नो मेकअप लूक फोटो व्हायरल होत आहे. 

कलाविश्वात सक्रीय असलेली प्रियदर्शनी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती तिचे फोटो,व्हिडीओ अपलोड करत असते. यामध्येच अलिकडे तिने तिचा नो मेकअप लूक असलेला फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे प्रियदर्शनी मेकअपशिवायही तितकीच छान दिसते.

दरम्यान, या फोटोमध्ये तिने कॉफी मगच्या आड तिचा चेहरा लपवला आहे. मात्र, त्यातूनही तिचा चेहरा दिसून येत आहे. प्रियदर्शनी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून अल्पावधीत ती लोकप्रिय झाली आहे.
 

Web Title: marathi actress Priyadarshini Indalkar no makeup look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.