मन रानात गेलं गं! जळगावमध्ये रमली प्रिया मराठे; केळीच्या बागेत केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 05:45 PM2024-04-03T17:45:00+5:302024-04-03T17:45:00+5:30

Priya marathe: प्रियाने तिच्या बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ काढत स्वत:चे क्षण जगली आहे हे या फोटोवरुन लक्षात येतं.

marathi actress Priya Marathe in Jalgaon A photo shoot was done in the banana garden | मन रानात गेलं गं! जळगावमध्ये रमली प्रिया मराठे; केळीच्या बागेत केलं फोटोशूट

मन रानात गेलं गं! जळगावमध्ये रमली प्रिया मराठे; केळीच्या बागेत केलं फोटोशूट

प्रिया मराठे (priya marathe) हे नाव आज हिंदी आणि मराठी या दोन्ही इंडस्ट्रीसाठी काही नवीन राहिलेलं नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रिया कलाविश्वात सक्रीय आहे.  या सुखांनो या पासून ते पवित्र रिश्ता पर्यंत अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. त्यामुळे आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतो. प्रियाही कायम तिच्याविषयीचे अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात नुकतेच तिने जळगावमधील तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

प्रिया सध्या तिच्या एका प्रोजेक्ट निमित्त जळगावला आले. त्यामुळे शुटिंगमधून जसा वेळ मिळेल तसं ती जळगावमध्ये फेरफटका मारत आहे. यामध्ये तिला एक सुरेख केळीची बाग दिसली आणि इथे फोटो काढायचा मोह तिला काही आवरता आला नाही. प्रियाने या केळीच्या बागेत काही फोटो क्लीक केले. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

प्रियाने हे फोटो जळगावमधील गारखेडा येथील एका गावात काढल्याचं सांगण्यात येत आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर आणि आनंदी दिसत आहे. तसंच तिचा सिंपल लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, प्रियाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. यात 'चार दिवस सासूचे', 'कसम से', 'या सुखांनो या', 'पवित्र रिश्ता', 'तू तिथे मी', 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'स्वराज जननी जिजामाता', 'येऊ कशी तशी मी नांदायला' यांसारख्या अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये ती झळकली आहे.

Web Title: marathi actress Priya Marathe in Jalgaon A photo shoot was done in the banana garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.