'तुझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली'; समीर चौघुलेसाठी प्राजक्ताची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 16:28 IST2023-06-29T16:27:46+5:302023-06-29T16:28:27+5:30
Prajakta mali: समीर आणि प्राजक्ता यांची खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे ते कायम एकमेकांविषयीच्या पोस्ट शेअर करत असतात.

'तुझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली'; समीर चौघुलेसाठी प्राजक्ताची खास पोस्ट
छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आज घराघरात पोहोचला आहे. त्यामुळे या कलाकारांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. यामध्येच नेटकऱ्यांमध्ये समीर चौघुले, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर या कलाकारांची नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असते. यावेळी सध्या चाहत्यांमध्ये समीर चौघुले (samir choughule) आणि प्राजक्ता माळीची (prajakta mali) चर्चा रंगली आहे. समीरच्या वाढदिवशी प्राजक्ताने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
आपल्या विनोदकौशल्याने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा समीर चौघुले आज त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
दुग्धशर्करा योग..! आषाढी एकादशीला तूझा ५० वा वाढदिवस आला…खरचं…, सगळ्या जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूतच आहेस… तूझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली… आणि मी “वाह् दादा वाह् fame- प्राजक्ता” झाले.. आणि ही ओळख आयूष्यभर राहील, असं वाटतं. तू अतिशय कष्टाळू, नम्र, भाबडा आणि अवलिया कलाकार आहेस; तूला आत्तापर्यंत मिळालेलं यश,प्रेम ही तर फक्त सुरूवात ठरो.., आणि इथून पुढे देवाचा आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर धुव्वाधार बरसत राहो; ह्याच तूला ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!", असं कॅप्शन देत प्राजक्ताने ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, समीर आणि प्राजक्ता यांची खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे ते कायम एकमेकांविषयीच्या पोस्ट शेअर करत असतात. इतकंच नाही तर समीरच्या प्रत्येक स्किटवर 'वाह् दादा वाह..' असं म्हणत प्राजक्ता विशेष चर्चेत आली. तसंच महाराष्ट्राची हास्यजत्रा या टीममध्ये समीर चौघुले आपला आवडता कलाकार असल्याचंही प्राजक्ताने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.