हळद हसु, मेहंदी रचली गं...! अभिनेत्री पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नविधींना सुरुवात, पहिला फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:16 IST2025-12-01T18:12:19+5:302025-12-01T18:16:19+5:30
बिरारींची लेक होणार बांदेकरांची सून; पूजा-सोहमच्या हळदीचे फोटो समोर

हळद हसु, मेहंदी रचली गं...! अभिनेत्री पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नविधींना सुरुवात, पहिला फोटो आला समोर
Pooja Birari And Soham Bandekar Wedding: मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा सुरु होत्या. पूजा बिरारी आता बांदेकरांच्या घरची सून होणार आहे. अलिकडेच पूजा-सोहमचं केळवण मोठ्या थाटात पार पडलं होतं. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चाहते प्रचंड उत्सुक होते. आता लवकरच हे दोघेही त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. नुकताच सोहम-पूजाचा हळदी समारंभ पार पडला, याचा पहिला फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे.

पूजा आणि सोहम यांचा मेहंदीसोहळा नुकताच पार पडला.आता दोघांनाही हळद लागली आहे.नुकतीच त्यांच्या हळदी समारंभाला दणक्यात सुरुवात झाली असून, मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार हळदीला पोहोचले आहेत. हळदी समारंभातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामध्ये अभिजीत केळकर, अभिनेत्री सानिका बनारसवाले यांसारखे लोकप्रिय कलाकार पूजा-सोहमच्या हळदीला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये सोहम- पूजा यांचं औक्षण देखील सुरु असल्याचं दिसतंय.
सानिका बनासरवालेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर मैत्रीण पूजाच्या हळदी समारंभाचे व्हिडीओ शेअर केले होते.आपल्या हळदीत पूजा बेभान होऊन नाचताना देखील दिसते आहे. यावेळी पूजाने सुंदर पारंपरिक लूक केला आहे. दरम्यान, मोठ्या उत्साहात पूजा-सोहमचा लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून हे दोघेही उद्या लग्नबंधनात अडकणार आहेत.
वर्कफ्रंट
पूजा बिरारीने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम करताना दिसते आहे. याशिवाय 'स्वाभिमान', 'साजणा' या मालिकांमध्येही ती दिसली होती. तर सोहम बांदेकर निर्माता आहे. त्यांचं 'बांदेकर प्रोडक्शन्स' आहे.