'मी तुमची खूप आभारी आहे'! निवेदिता सराफ यांनी मानले जॉनी लिव्हरचे आभार; पण का??

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 03:39 PM2023-04-26T15:39:48+5:302023-04-26T15:40:41+5:30

Nivedita saraf: निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत जॉनी लिव्हर यांचे आभार मानले आहेत.

marathi actress nivedita saraf meet johnny lever after mi swara aani te dogha drama play | 'मी तुमची खूप आभारी आहे'! निवेदिता सराफ यांनी मानले जॉनी लिव्हरचे आभार; पण का??

'मी तुमची खूप आभारी आहे'! निवेदिता सराफ यांनी मानले जॉनी लिव्हरचे आभार; पण का??

googlenewsNext

मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे निवेदिता सराफ. अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम करत आपलं अभिनयकौशल्य दाखणाऱ्या निवेदिता यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे. इतंकच नाही तर त्या अजूनही नाटकांमध्ये काम करतात. विशेष म्हणजे अलिकडेच त्यांच्या नाटकाला अभिनेता, विनोदवीर जॉनी लिव्हर याने हजेरी लावली होती. त्यानिमित्ताने निवेदिता यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. इतकंच नाही तर हा त्यांचा फॅन मूव्हमेंट होता असंही त्यांनी सांगितलं.

निवेदिता सराफ सध्या मी स्वरा आणि ते दोघे या नाटकात काम करत आहेत. यात नाटकाला चक्क जॉनी लिव्हरने हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत निवेदिता यांनी फॅन मूव्हमेंट असल्याचं सांगितलं. सोबतच त्यांचा एक्सपिरिअन्सही शेअर केला.

“माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण होता. माझा आवडता अभिनेता आणि व्यक्ती असलेले जॉनी भाऊ माझं ‘मी स्वरा आणि ते दोघे’ हे नाटक पाहायला आले. ही माझ्यासाठी एक फॅन मूव्हमेंट होती. त्यांनी या नाटकाचे आणि माझ्या अभिनयाचे कौतुक केले. मी तुमची खूप आभारी आहे, जॉनी भाई”, असे निवेदिता सराफ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 'भाग्य दिले तू मला' या मालिकेच्या माध्यमातून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या निवेदिता सराफ या 'मी स्वरा आणि ते दोघे' हे नाटकही करत आहेत. या नाटकात त्यांच्यासोबत सुयश टिळक, रश्मी अनपट हे कलाकार काम करत आहेत.
 

Web Title: marathi actress nivedita saraf meet johnny lever after mi swara aani te dogha drama play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.