मराठी अभिनेत्रीने दाखवली तिच्या ८ महिन्याच्या लेकाची झलक; लग्नानंतर इंडस्ट्री सोडून परदेशात झाली स्थायिक
By कोमल खांबे | Updated: October 10, 2025 13:37 IST2025-10-10T13:27:35+5:302025-10-10T13:37:18+5:30
अभिनेत्री नेहा गद्रे काही महिन्यांपूर्वीच आई झाली. फेब्रुवारी महिन्यात नेहाने तिच्या गोंडस बाळाला जन्म दिला. नेहाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. नेहाचा लेक आता ८ महिन्यांचा झाला आहे.

मराठी अभिनेत्रीने दाखवली तिच्या ८ महिन्याच्या लेकाची झलक; लग्नानंतर इंडस्ट्री सोडून परदेशात झाली स्थायिक
'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री नेहा गद्रे काही महिन्यांपूर्वीच आई झाली. फेब्रुवारी महिन्यात नेहाने तिच्या गोंडस बाळाला जन्म दिला. नेहाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. नेहाचा लेक आता ८ महिन्यांचा झाला आहे. त्यांनी लेकाचं नाव इवान असं ठेवलं आहे. सोशल मीडियावरुन नेहाने पहिल्यांदाच तिच्या लेकाचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.
नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एका बास्केटमध्ये दोन छोट्या दुधाच्या बाटल्या दिसत आहेत. नेहाचा लेक सोफ्यावर बसल्याचं दिसत आहे. या व्हिडीओतून अभिनेत्रीने तिच्या लेकाचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. "आमच्या छोट्या इवानला भेटा. असं म्हणतात की तुमच्या बाळाला मोठं होताना बघणं म्हणजे तुमचं हदय शरीराबाहेर पळतंय असं वाटतं. आणि हे खरंच आहे. इवान तू माझं हृदय, आत्मा सगळं काही आहेस", असं कॅप्शन नेहाने या व्हिडीओला दिलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, 'मन उधाण वाऱ्याचे'नंतर नेहा अजूनही चांदरात आहे मालिकेत दिसली होती. मोकळा श्वास, गडबड झाली या सिनेमांतही तिने काम केलं होतं. २०१९ मध्ये नेहाने ईशान बापटसोबत लग्न केलं. लग्नानंतर नेहा नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. परदेशात स्थायिक झाली असली आणि सिनेइंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते.