सध्या काय करतीये सहकुटुंब सहपरिवारची सरु? निसर्गाच्या सानिध्यातील खास फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 12:26 IST2023-10-13T12:26:03+5:302023-10-13T12:26:40+5:30

Nandita patkar: नंदिताचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

marathi actress nandita patkar share beautiful photo on social media | सध्या काय करतीये सहकुटुंब सहपरिवारची सरु? निसर्गाच्या सानिध्यातील खास फोटो केले शेअर

सध्या काय करतीये सहकुटुंब सहपरिवारची सरु? निसर्गाच्या सानिध्यातील खास फोटो केले शेअर

छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' (sahakutumb sahaparivar). काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, अजूनही या मालिकेची आणि त्यातील कलाकारांची लोकप्रियता कायम आहे. त्यामुळे ही मालिका संपल्यानंतर ही कलाकार मंडळी सध्या काय करतात असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. यामध्येच मालिकेतील सरू म्हणजेच अभिनेत्री नंदिता पाटकर (nandita patkar) हिचे काही फोटो समोर आले आहेत.

नंदिताचा सोशल मीडियावर दांडगा वावर आहे. त्यामुळे ती कायम काही ना काही नवनवीन पोस्ट शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यात नंदिताने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे रोजच्या धावपळीतून तिने वेळ काढला आहे. इतकंच नाही तर सध्या ती निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आहे.

नंदिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे. सोबतच ती मस्तपैकी झाडांच्या सावलीत बसली आहे, तिचा हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Web Title: marathi actress nandita patkar share beautiful photo on social media