लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:15 IST2026-04-06T16:12:34+5:302026-04-06T16:15:35+5:30
ओळखलंत का या अभिनेत्रीला? लग्नाचा फोटो व्हायरल

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतून घराघरात पोहोचली. तसंच 'एलिझाबेथ एकादशी' सिनेमामुळे तिला विशेष ओळख मिळाली. नंदिताने नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे. विपुल महागावकरसोबत ती लग्नबंधनात अडकली आहे. गळ्यात हार घातलेला नवरा-नवरीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नंदिता पाटकर गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. 'माझे पती सौभाग्यवती' या २०१५-१६ साली आलेल्या मालिकेत ती वैभव मांगलेसोबत दिसली होती. नंदिताने मराठी इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी नंदिताचं लग्न झालं होतं. मात्र काही कारणाने तिचा घटस्फोट झाला. आता इतक्या वर्षांनी तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं आहे. तिने नवीन संसाराला सुरुवात केली आहे. नंदिताचा नवऱ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फिक्या रंगाची साडी, हातात चुडा, नथ, मोत्याचे दागिने या लूकमध्ये नंदिता सुंदर दिसत आगे. तर विपुल तशाच रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये हँडसम दिसत आहे. दोघांच्या गळ्यात हार आहेत. हा फोटो पाहून नंदिताच्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोण आहे विपुल महागावकर?
विपुल महागावकर मराठी इंडस्ट्रीतलाच आहे. तो नाट्य दिग्दर्शक, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि नाट्य संयोजक आहे. त्याने १७ पेक्षा जास्त एकांकिकांचं आणि ५ प्रायोगिक नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'पै पैशांची गोष्ट','उद्धवस्त धर्माशाळा','खिडकी' या नाटकासाठी त्याला विशेष ओळख मिळाली.
सध्या नंदिता 'शेवग्याच्या शेंगा' नाटकात काम करत आहे. तसंच तिचं 'व्हय, आय अॅम सावित्रीबाई फुले' हे नाटकही गाजलं होतं. त्यातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं.