"तुझ्यासोबत भांडल्याशिवाय...", प्रसाद खांडेकरच्या वाढदिवशी नम्रता संभेरावने लिहिली खास पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:29 IST2025-05-05T15:26:46+5:302025-05-05T15:29:28+5:30

"एकत्र यशस्वी होऊ ही भावना...", प्रसाद खांडेकरसाठी नम्रता संभेरावची सुंदर पोस्ट, म्हणाली- "जो करेंगे..."

marathi actress namrata sambherao shared special post for prasad khandekar birthday on social media | "तुझ्यासोबत भांडल्याशिवाय...", प्रसाद खांडेकरच्या वाढदिवशी नम्रता संभेरावने लिहिली खास पोस्ट 

"तुझ्यासोबत भांडल्याशिवाय...", प्रसाद खांडेकरच्या वाढदिवशी नम्रता संभेरावने लिहिली खास पोस्ट 

Namrata Sambherao Post: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. आपलं विनोदी कौशल्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अनेक मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमधून काम करुन नम्रताने सिनेसृष्टीत हक्काचं स्थान मिळवलं आहे. अशातच नुकतीच अभिनेत्री तिचा मित्र तसेच हास्यजत्रेतील सहकलाकार अभिनेता प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. 


नुकतीच नम्रता संभेरावने अभिनेता प्रसाद खांडेकरच्या वाढदिवशी सुंदर शब्दांत त्याचं वर्णन करुन पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये नम्रताने लिहिलंय, "वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा पश्या..., 10 years of friendship...! एक चालता फिरता बोलका, हळवा मेहनती, जिद्दी, प्रेमळ, रागिष्ट, रुसलेला, हसरा, रडका आशावादी प्रचंड उर्जा आणि दर्जा असलेला वाघ सोबत घेऊन फिरतेय मी गेली 10 वर्षे. या वाघाचं वैशिष्ट्य असं आहे की हा वाघ स्वतःबरोबर इतरांची उपासमार होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतो. आम्हाला कळपात राहायला आवडतं. हा चष्मेवाला वाघ तुम्हाला शोधून सापडणार नाही."

त्यानंतर पुढे नम्रताने प्रसाद खांडेकरचं कौतुक करत पोस्टमध्ये म्हटलंय, "जो करेंगे साथ में, एकत्र यशस्वी होऊ ही भावना खूप कमी जणांच्या मनात येते पैकी हा माझा दोस्त अशा विचारांचा आहे. उत्तम व्यक्तिमत्व अत्यंत talented प्रचंड workoholic आणि गोड माणसाचा, म्हणजे माझ्या मित्राचा पश्याचा आज वाढदिवस.आयुष्यभर असंच हसत रहा हसवत रहा, भांडत रहा प्रेम करत रहा, मजा करू एकत्र काम करू अवॉर्ड्स घेऊ प्रोत्साहन देत राहू आणि असेच कायम सोबत राहू. तुझ्यासोबत भांडल्याशिवाय मी जगू शकत नाही. happy birthday pashya खूप खूप प्रेम...". अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे.   

Web Title: marathi actress namrata sambherao shared special post for prasad khandekar birthday on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.