अमेरिकेत वाढलेली मृणालची लेक भारतात आल्यावर आजीकडून शिकली 'हा' मराठी शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 11:48 IST2024-06-03T11:13:48+5:302024-06-03T11:48:16+5:30

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मृणालने तिच्या गोंडस मुलीविषयी माहिती दिली.  

Marathi Actress Mrunal Dusanis Says Her Daughter Nurvi Learned Only One Word In America AND ONE Word IN INDIA | अमेरिकेत वाढलेली मृणालची लेक भारतात आल्यावर आजीकडून शिकली 'हा' मराठी शब्द

अमेरिकेत वाढलेली मृणालची लेक भारतात आल्यावर आजीकडून शिकली 'हा' मराठी शब्द

'तू तिथे मी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस.  मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिलखुलास चेहरा म्हणून तिला ओळखले जाते. मृणालने आपल्या सुंदर अभिनयाने आणि निरागस चेहऱ्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. लग्नानंतर मृणाल ही अमिरेकत स्थायिक झाली होती. पण आता पती आणि लेकीसह ती तब्बल ४ वर्षांनी भारतात परतली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मृणालने तिच्या गोंडस मुलीविषयी माहिती दिली.  

मृणालची लेक दोन वर्षांची आहे. 24 मार्च 2024 रोजी तिचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. नूर्वी असं तिनं आपल्या लाडक्या लेकीचं नाव ठेवलं आहे. नूर्वीचा जन्मही अमिरेकत झाला. अलिकडेच मृणाल दुसानिस हिनं लोकमत फिल्मीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत ती नूर्वीविषयी भरभरुन बोलली. अमेरिकतून भारतात परतल्यानंतर  नूर्वीचं रुटीन सेट झालं नसून ते करण्याचा प्रयत्न असल्याचं मृणाल म्हणाली. तसेच तिला हाताने खायची सवय लावल्याचही मृणालने सांगितलं.

 

मृणाल म्हणाली, "आता इथे नूर्वी आता आज्जीशी खेळते, माझ्या आईबरोबर खेळते. इथे तिला मित्र मिळाली आहेत, तिथं नव्हती. इथं तिच्याशी सगळेजण मराठीतच बोलतो. तिकडे अमेरिकेत ती फक्त 'नो' हा एकच शब्द शिकली होती. आता ती 'आहे' हा नवीन मराठी शब्द शिकली आहे. मला तिला नॉर्मल, घरगुती ठेवावसं वाटतं. आता तिचं ती काही गोष्टी शिकतेय, मराठी बोलतेय, खाली मित्रमैत्रिणींबरोबर खेळते, तिच्याकडे सायकल आहे'. यासोबतच  नूर्वीला  गाणं गायला आणि पोहायला शिकवायचं असल्याचं मृणालने सांगितलं. 

गेल्या काही वर्षांपासून मृणाल सिनेसृष्टीपासून लांब होती. काही काळ तिने कामातून ब्रेक घेतला होता.  मृणालचे चाहते तिला मिस करत होते. आता मृणाल भारतात परतताच तिने नव्या मालिकेत किंवा सिनेमात झळकावं अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मृणाल कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

Web Title: Marathi Actress Mrunal Dusanis Says Her Daughter Nurvi Learned Only One Word In America AND ONE Word IN INDIA